भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा एक चांगला यष्टीरक्षक म्हणूनही ओळखला जातो. तो यष्टीमागून अनेकदा गोलंजांना सल्ले देतानाही दिसले आहे. मात्र, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे त्याची कमी भासते, अशी कबुली कुलदीप यादवने दिली आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची कमी जाणवत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे 2019 च्या वर्ल्ड कप नंतर दोघे कधीही एकत्र सामना खेळलेले नाहीत.
कुलदीप यादव ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “कधीकधी मला माही भाई (एमएस धोनी) यांच्या मार्गदर्शनची कमी जाणवते, कारण त्यांना खूप अनुभव होता. ते सतत स्टम्पच्या मागून आम्हाला मार्गदर्शन करीत असे. आम्हाला त्यांच्या अनुभवाची कमी जाणवते. रिषभ पंत आता त्यांच्या जागी खेळत आहे, तो जितका जास्त खेळेल तितका आम्हाला भविष्यात अधिक मार्गदर्शन करण्यास सक्षम होईल.”
कुलदीप यादवने 2019 मध्ये 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर 2020 आणि 2021 मध्ये त्याने आतापर्यंत फक्त 7 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने जुलै 2019 मध्ये शेवटचा सामना खेळला होता.
कुलदीप पुढे म्हणाला की, “जेव्हा माही भाई (एमएस धोनी) संघात होते, तेव्हा मी आणि युजवेंद्र चहल सोबत खेळत होतो. माही भाई गेल्यापासून मी आणि चहल एकत्र खेळलो नाही. मला काही मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली. मी एकूण 10 सामने खेळले असावेत, ज्यात मी हॅट्रिकही घेतली. माझ्या कामगिरीकडे पाहिले तर कामगिरी चांगली होती. ”
दरम्यान, कुलदिपच्या करियरबाबत विचार केला असता, तो काहीसा कठीण काळातून जात आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या कसोटी संघात त्याचा समावेश नसून, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की श्रीलंका दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश केला जातो अथवा नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आम्ही चालवू पुढे वारसा! नबीच्या मुलाने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल, केली षटकारांची आतिषबाजी
झहीर-युवराजसोबत केली कारकीर्दीची सुरुवात, मात्र ‘त्याला’ एका वर्षात जावे लागले संघाबाहेर
भारतीय संघात निवड झालेल्या नागवासवालाला बुमराहने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला