---Advertisement---

विश्वचषकासाठी डावलल्यानंतर ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू पोहोचला मेस्सीला सपोर्ट करण्यासाठी

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 10:49 AM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी सराव करण्यात व्यस्त आहे. या संघात स्थान न मिळवू शकलेला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या मिळालेल्या रिकाम्या वेळेचा आनंद घेताना दिसून येत आहे. त्याने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो पॅरीसमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहेत.

भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या पॅरीसमध्ये आहे. त्याने मंगळवारी (१९ ऑक्टोबर) पॅरीसची भ्रमंती करून झाल्यानंतर पॅरीस सेंट जर्मन आणि आरपी लीपजिग या दोन्ही मोठ्या संघांमधील फुटबॉल सामन्याचा आनंद घेतला.

कुलदीप यादव हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. तो चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतो. त्याने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो फुटबॉल स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी देखील भरपूर गर्दी केली होती. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुलदीप यादवने मेस्सी नावाची जर्सी परिधान केले आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने ‘पार्क देस प्रिन्सेस’ असे लिहिले आहे. या सामन्यात पॅरीस सेंट जर्मन संघाने लीपजिग संघावर २-२ ने विजय मिळवून सामना आपल्या नावावर केला

https://www.instagram.com/p/CVPw6-PPwzL/?utm_medium=copy_link

दुखापतीमुळे झाला संघाबाहेर

कुलदीप यादव आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. दरम्यान यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला सराव करत असताना दुखापत खाली होती. ज्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. तसेच त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. कुलदीप यादवचा खराब फॉर्म अजूनही सुरू आहे. ज्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. इतकेच नव्हे तर आयपीएल स्पर्धेत देखील प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतोय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---