---Advertisement---

चालू सामन्यात अपांयरिंग सोडून कुमार धर्मसेना चक्क बनले फिल्डर, Video व्हायरल

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत श्रीलंकेचा संघ २-१ असा पुढे आहे. कोलंबो येथे रविवारी (१९ जून) झालेल्या या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत २९१ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने ९ चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. या सामन्यातील पंचांनी क्षेत्ररक्षण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत  आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीने स्क्वेयर लेगच्या दिशेने चेंडू खेळला. हा चेंडू हवेत असताना पंच कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांना तो आपल्या दिशेने येताना दिसला. चेंडू समोर आला असता धर्मसेना यांनी पाय मागे घेत झेल घेण्यासाठी हात पुढे केला असता नंतर त्यांना कळून चुकले की हे चुकीचे आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट पेज क्रिकेट डॉट कॉम एयू यांनी हा फोटो ट्वीट करत त्याला ‘झेल, पंच कुमार धर्मसेना हे क्षेत्ररक्षणाच्या भुमिकेत येणार होते… पण बरं झाले त्यांनी असे केले नाही”, असे कॅप्शन दिले आहे.

अष्टपैलू धर्मसेना यांनी श्रीलंकेकडून १५०पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २००६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २००९मध्ये पंच म्हणून पदार्पण केले. २०११च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी पंचांची भुमिका योग्य पार पाडली होती.

क्रिकेट डॉट कॉम एयूचे ट्वीट व्हायरल झाल्याने चाहत्यांनी ट्वीट करत याचा आनंद घेतला आहे.

https://twitter.com/sportsfan_cric/status/1538698840731430912?s=20&t=k-a1XXSDFXg23pAu7FfWHw

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतके करत २९२ धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते. या धावसंख्येच्या पाठलागामध्ये पथुम निसांकाने १४७ चेंडूत १३७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ११ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.त्याच्या या सामनाविजयी खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाल. या मालिकेतील चौथा सामना २१ जूनला कोलंबो येथेच खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इशान किशनचे द्विशतकी योगदान, ‘हे’ आहेत सर्वाधिक धावा करणारे पाच खेळाडू

लज्जास्पद..! सेल्फी घ्यायला आलेल्या ग्राउंड्समनला ऋतुराजची अपमानकारक वागणूक, हाताने दिला धक्का

आयर्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सना दिली मोठी भेट, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---