श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मागील बऱ्याच काळापासून संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावणारा रिषभ पंत या दोन्ही मालिकांसाठी संघात आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला. तो दुखापतीमुळे विश्रांतीवर असल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, तो सातत्याने खराब कामगिरी करत असल्याने त्याला बाहेर केले गेल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे. तो संघातून बाहेर झाल्यानंतर आता श्रीलंकेचा माजी कर्णधार व दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने त्याला एक सल्ला दिला आहे.
संगकारा नुकताच एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्याने पंत याच्या यष्टीरक्षणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. संगकारा म्हणाला,
“रिषभच्या फलंदाजीविषयी माझ्या मनात कोणतीच शंका नाही. त्याच्याकडे सर्व फटके आहेत. क्षमता आणि गुणवत्ता ही आहे. तरीही त्याला थोडे आणखी जबाबदारीने व हुशारीने खेळावे लागेल. दुसरीकडे, त्याला आपल्या यष्टीरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. त्याने यष्टीरक्षणात सुधारणा करणे गरजेचे आहे. आजकाल सर्व यष्टीरक्षक फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करतात. मात्र, तुम्ही यष्टीरक्षक असता तेव्हा तुमचे ते कौशल्यही महत्वाचे आहे.”
संगकाराने याच कार्यक्रमात संजू सॅमसन याचेही कौतुक करत त्याला अधिक संधी मिळण्याची गरज असल्याचे म्हटले.
सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली जात होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकट्याच्या जीवावर सामने भारताला जिंकून दिले आहेत. सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अनेक पर्याय दिसून येतात. या मालिकेसाठी केएल राहुल व ईशान किशन हे वनडे मालिकेचा भाग आहेत. तर, संजू सॅमसन हा टी20 मालिकेत खेळताना दिसेल.
(Kumar Sangakkara Advice To Rishabh Pant)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची जबाबदारी
क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण