---Advertisement---

संजूला स्वत:वर विश्वास असल्याने त्याने जोखीम घेतली; ‘त्या’ विवादीत निर्णयाबद्दल संगाकाराचे मोठे भाष्य

---Advertisement---

सोमवारी (१२ एप्रिल) मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात पंजाबने अवघ्या ४ धावांनी राजस्थानच्या जबड्यातून विजय खेचून घेतला. दरम्यान शेवटच्या षटकात एक प्रसंग घडला, ज्यावेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने संघ सहाकारी ख्रिस मॉरिसला धाव घेण्यास नकार दिला आणि पुढे तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

त्यामुळे सॅमसनच्या त्या कृत्याची अनेकांनी टीका केली आहे. अशात राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी नवनियुक्त कर्णधाराचा बचाव केला आहे. सॅमसनला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असल्याने त्याने तो निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर झाले असे की, पंजाबच्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघ १९ व्या षटकापर्यंत ६ बाद २०९ धावा अशा स्थितीत होता. २० वे षटका टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंगच्या पहिल्या ४ चेंडूवर सॅमसन आणि ख्रिस मॉरिसने मिळून ८ धावा काढल्या होत्या.

अखेरच्या २ चेंडूंवर संघाला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. यावेळी पाचव्या चेंडूवर सॅमसनने डिप एक्स्ट्रा कव्हरवर शॉट खेळला. त्यानंतर लगेचच नॉन स्ट्राईकवर असलेल्या मॉरिसने एक धाव घेण्यासाठी सॅमसनला इशारा केला आणि वेगाने स्ट्राईकर एंडकडे धावला. परंतु सॅमसनने त्याला नकार दिल्याने मॉरिसला माघार घ्यावी लागली. अखेर षटकातील शेवटच्या सहाव्या चेंडूवर सॅमसनने विजयी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दिपक हुडाने सीमारेषेजवळ त्याचा झेल घेत संघाला सामना जिंकून दिला.

https://youtu.be/rPgyv_mqXsc

यानंतर सॅमसन निर्णायक धाव घेण्यास नकार देत ट्रोलर्सच्या तावडीत सापडला आहे. यावर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना संगकारा म्हणाला की, “माझ्या मते सॅमसनने आपल्या क्षमतेवर विश्वास असल्याने तो निर्णय घेतला असावा. त्याने त्यानुसार चेंडू षटकारासाठी पाठवलाही होता. परंतु चेंडू ५-६ यार्ड मागे पडल्याने षटकार न जाता तो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूत्या हाती गेला.”

“कधीकधी तुम्ही फॉर्ममध्ये असाल आणि तुम्हाला तुमच्या कुवतीवर विश्वास असेल की तुम्ही हे करु शकता. तर तुम्ही जोखीम घेता. सॅमसनने निर्णायक क्षणी जोखीम घेणे खरच प्रेरणादायी होते. आपण इथे एक धाव तिथे दुसरी धाव सुटली यावरुन खेळाडूवर टीका करत असतो. परंतु माझ्यासाठी खेळाडूचा स्वत:वरील आत्मविश्वास, त्याचे धाडस आणि वनचबद्धता हीच त्यांची खरी ताकद आहे. सॅमसनने स्वतवर सामना यशस्वीपणे संपवण्याची जबाबदारी घेतली, याचा आनंद आहे. मला विश्वास आहे तो पुढील सामन्यात १० यार्ड पुढे चेंडू टोलवत सामना जिंकून देईल,” असे त्यांनी पुढे म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात

मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय

Video: झेल घेण्याच्या प्रयत्नात शमी-राहुलची जोरदार धडक, कर्णधाराची रिऍक्शन होती पाहण्यासारखी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---