राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २२१ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात झेल टिपताना टक्कर झाल्याचे पहायला मिळाले आहे. यानंतर राहुलने दिलेली रिऍक्शन लक्षवेधी ठरली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात बेन स्टोक्स आणि मनन वोहरा यांची जोडी आली होती. तर गोलंदाजीची सुरुवात मोहम्मद शमीने केली होती. पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू शमीने गुड लेन्थवर टाकला होता. हा चेंडू बेन स्टोक्सने मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत हवेत उडाला होता.
तो झेल टिपण्यासाठी मोहम्मद शमी आणि केएल राहुल दोघेही धावले होते. तो झेल शमीने टिपला परंतु झेल पकडण्यापुर्वी शमीने त्याला इशाऱ्यात सांगितले होते की, हा झेल मी घेणार आहे तरी देखील तो आला होता. झेल टिपलेवेळी त्यांच्यात टक्कर झाली आणि राहुल खाली पडला. यानंतर राहुल काही वेळ गुडघ्यावर मैदानात बसून शमीकडे एकटक पाहू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/its_nikhil_srg/status/1381644269702631427?s=20
https://twitter.com/KirketVideoss/status/1381643449183698947?s=20
https://twitter.com/CricketUnlimi/status/1381648307701702657?s=20
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत २२१ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची तुफानी खेळी केली. तर दीपक हुड्डाने देखील चौफेर फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. यासोबतच ख्रिस गेलने देखील ४० धावांचे योगदान दिले होते. पंजाब किंग्ज संघाच्या धावा पाहून सामना एकहाती पंजाबच्या नावावर होतो की काय असे वाटू लागले होते.
परंतु वानखेडे स्टेडियमवर संजू सॅमसन नावाचे वादळ आले होते. संजू सॅमसनने ११९ धावांची खेळी करत सामना शेवटच्या चेंडू पर्यंत नेला होता. परंतु अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना संजू सॅमसन झेलबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीची नेटकऱ्यांनी केली थट्टा; चहलही म्हणाला, ‘वेलकम टू आरसीबी बॉइज’
ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस वर्ल्डची भविष्यवाणी ठरली खरी, केकेआरचा विजयासह झाला शुभारंभ
“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक