बुधवारी (७ जुलै) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातील चाहत्यांसह अनेक आजी-माजी खेळाडूंकडूनही शुभेच्था मिळाल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही धोनीसाठी खास व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. असे असले तरी आयसीसीने धोनीला शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर कुमार संगकाराने एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्याने अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे.
आयसीसीने धोनीच्या चपळ यष्टीरक्षण दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने कॅप्शन लिहिले आहे की ‘काही सेंकदाच्या कालावधीत धोनी विजेच्या गतीने स्टंपवरील बेल्स बाजूला करते. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
https://twitter.com/ICC/status/1412713005557686275
तसेच आयसीसीने या व्हिडिओच्या थंबनेलवर धोनीच्या फोटोसह लिहिले आहे की ‘पूर्वेकडील वेगवान हात’. यातून आयसीसीला आशिया खंडातील वेगवान हालचाली करणारा यष्टीरक्षक असे सुचवायचे होते.
यावर संगकाराने प्रतिक्रिया देत ट्विट केले की ‘केवळ पूर्वेकडीलच नाही, तर त्याच्या काळातील जगातील वेगवान हात.’ संगकाराच्या या ट्विटने अनेक क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनेक चाहत्यांनी संगकाराचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/KumarSanga2/status/1412717248117104645
धोनी आणि संगकारा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांच्या यादीत
धोनी आणि संगकारा हे जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये गणले जातात. यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक वनडे सामने खेळण्याच्या यादीतही संगकारा अव्वल क्रमांकावर तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने ३६० वनडे यष्टीरक्षक म्हणून खेळले आहेत, तर धोनीने ३५० वनडे यष्टीरक्षक म्हणून खेळले आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या क्रिकेपटूंमध्ये देखील मार्क बाऊचर आणि ऍडम गिलख्रिस्ट पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर धोनी आणि चौथ्या क्रमांकावर संगकारा आहे. बाऊचरने ९९८ वेळा, गिलख्रिस्टने ९०५ वेळा, धोनीने ८२९ वेळा आणि संगकाराने ६७१ वेळा यष्टीमागून फलंदाजांना बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंत असेल भारताचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी
आयसीसीने गांगुलीला दिल्या ‘डबल’ शुभेच्छा, शानदार खेळीचा व्हिडिओ केला पोस्ट
ले पंगा! बांगलादेश-झिम्बाबेचे क्रिकेटपटू भिडले चालू सामन्यात, व्हिडिओ होतोय व्हायरल






