---Advertisement---

आर्चर, स्टोक्स राजस्थान रॉयल्समधून मुक्त! संगकाराकडून निर्णायामागचे खरे कारण उघड

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. नुकतेच मंगळवारी (३० नोव्हेंबर) आयपीएल २०२२ साठी संघांनी कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना संघांनी अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या इंग्लंडच्या खेळाडूंचाही समावेश आहे. याबद्दल आता राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने मोठी प्रतिक्रिया आहे.

आयपीएल २०२२ हंगामासाठी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये नियमित खेळणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी किमान ४ खेळाडू संघात कायम करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वाल या तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे. पण, त्यांनी स्टोक्स आणि आर्चर सारख्या दिग्गजांना मुक्त केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.

पण, राजस्थानने ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संगकाराने त्यांच्या या निर्णायामागील कारण सांगितले आहे. संगकाराने स्टोक्स आणि आर्चरचे कौतुकही केले आहे.

तो म्हणाला, ‘हा निर्णय अत्यंत कठीण होता. ते दोघेही जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. बेन स्टोक्स सर्वोत्तम अष्टपैलू आहे, ज्याला मी बऱ्याच काळापासून पाहिले आहे. तो एक मॅचविनर आहे, हे त्याने राजस्थानकडून खेळताना सिद्ध केले आहे. तो एक टीममॅन म्हणून शानदार राहिला, नेतृत्त्वाच्या भूमीकेतही चांगला होता. तो मैदानावर एक उर्जा घेऊन येतो. पण, आम्हाला संभावित कायम करणाऱ्या खेळाडूंच्या संख्येबद्दल विचार करावा लागणार होता, तसेच खेळाडूच्या उपलब्धतेवर, तो किती सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे, अशा गोष्टी होत्या.’

संगकारा पुढे म्हणाला, ‘जोफ्रा आर्चरबरोबरही हीच गोष्ट लागू होते. आम्ही दुखापती, त्यातून सावरण्यासाठी लागणारा वेळ याबद्दल माहिती घेण्यासाठी सर्व काही केले. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात जोफ्रा आर्चरसारखा खेळाडू नाही, विशेषत: टी२० क्रिकेटमध्ये. मला माहित आहे की खेळाडू आमचे तर्क समजतात. भलेही ते या सगळ्यामुळे निराश असतील, पण मला खात्री आहे की ते समजतील, आम्ही एका फ्रेंजायझीच्या भूमीकेत आहोत.’

खरंतर स्टोक्स आणि आर्चर राजस्थान संघातील महत्त्वाचे खेळाडू होते. पण, त्यांना गेल्या हंगामात दुखापतींनी ग्रासले होते. स्टोक्स केवळ एकच सामना आयपीएल २०२१ हंगामात खेळला, तर स्टोक्स एकही सामना खेळला नाही. याच मुख्य कारणांमुळे राजस्थानने त्यांना कायम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबीने रिलीज केलेल्या गोलंदाजाचा टी१० लीगमध्ये डंका, अवघ्या १० चेंडूंत मिळवले तब्बल ५ बळी

कसोटी क्रमवारी: श्रेयस अय्यरची पदार्पणातच मोठी उडी, शाहिन आफ्रीदीही टॉप ५ मध्ये

‘चॅप्टर क्लोज!’ सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर डेविड वॉर्नर झाला व्यक्त, चाहत्यांचेही मानले आभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---