बांगलादेशविरुद्धचा आपला अखेरचा साखळी फेरी सामना श्रीलंका संघाने 2 विकेट्स राखून जिंकला. उभय संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. हा सामना जिंकत सुपर-4 फेरीत प्रवेश करण्याची संधी होती. मात्र बांगलादेशच्या संघाने छोटछोट्या चुका करत ही संधी हातून गमावली. त्यातही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे श्रीलंकेचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याला तब्बल 5 वेळा जीवनदान मिळाले आहे. याच जीवनदानांचा फायदा घेत त्याने अर्धशतक झळकावले आणि सामनावीरही ठरला.
बांगलादेशच्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मेंडिसने (Kusal Mendis) 37 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. आपल्या या खेळीदरम्यान तो 5 वेळा बाद होण्यापासून वाचला. नशीबाने त्याला इतकी साथ दिली की, बांगलादेशच्या खेळाडूंनी डोके धरले.
मेंडिसला पहिले जीवनदान (Kusal Medis Got Live) पहिल्याच धावेवर मिळाले होते. सलामीला फलंदाजीला आलेल्या मेंडिसला डावातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जीवनदान मिळाले. बांगलादेशचा गोलंदाज मुशफिकुर रहीम याने मेंडिसचा झेल सोडला. त्यानंतर 29 धावांवर असताना त्याला दुसऱ्यांदा जीवनदान मिळाले. यावेळा बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसन याने त्याला बाद केले होते. परंतु तो नो बॉल होता, त्यामुळे त्याला बाद दिले गेले नाही. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हा प्रसंग घडला.
https://twitter.com/SalmanHassan__/status/1565377768065421315?s=20&t=34LEA1TevroWMThKMmSF_Q
त्यानंतर आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो झेलबाद झाला होता. परंतु बांगलादेश संघाने रिव्ह्यू न घेतल्याने मेडिंसला पुन्हा जीवनदान मिळाले. पुढे अकराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मेंडिसला नशीबाची साथ मिळाली. येथे कर्णधार दसुन शनाका याच्यासोबत धाव घेताना गोंधळ झाल्याने मेंडिस धावबाद होऊ शकला असता. परंतु तो बाद होता होता वाचला. 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा मेंडिस बाद होण्यापासून वाचला. मेहिदी मिराजच्या चेंडूवर हवेत फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊ शकला असता. परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पुढे जाऊन पडल्याने त्याला जीवनदान मिळाले.
अशाप्रकारे 5 वेळा जीवनदान मिळालेला मेंडिस अखेर 15व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी
हिशोब बरोबर! 4 वर्षांपूर्वीचा सूड पूर्ण करत श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा
चोरीचा मामला.. बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची चिटिंग? ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आले सिक्रेट कोड






