पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 8वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याने तडाखेबंद शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे, 94 धावांवर खेळत असताना मेंडिसने 27व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचत आपले वनडेतील तिसरे शतक झळकावले. यासोबतच त्याने खास विक्रमही नावावर केला. तो विश्वचषकाच्या इतिहासात श्रीलंकेकडून वेगवान शतक ठोकणारा फलंदाजही बनला.
कुसलचे विक्रमी शतक
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लंकेकडून सलामीला पथुम निसांका आणि कुसल परेरा उतरले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसन अली याने परेराला बाद केले. त्यानंतर कुसल मेंडिस (Kusal Mendis) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मेंडिसने यावेळी सावकाश सुरुवात केली. त्याने आधी 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढील 25 चेंडूत त्याने पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम काढत 50 धावांचा पाऊस पाडला.
Kusal Mendis smashed the fastest hundred by a Sri lankan player in World Cup history.
– 100* from just 65 balls against Pakistan. pic.twitter.com/inywsZI30H
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2023
त्याने अवघ्या 65 चेंडूत 100 धावा केल्या. 94 धावांवर खेळताना त्याने मागचा-पुढचा विचार न करत खणखणीत षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. मेंडिसने आपल्या खेळीत पुढे आणखी 22 धावा जोडल्या. त्याने या सामन्यात फक्त 77 चेंडूंचा सामना करताना 122 धावांची झंझावाती खेळी साकारली. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 14 चौकारांचाही पाऊस पाडला.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
विशेष म्हणजे, मेंडिसने केलेली 122 धावांची खेळी ही त्याची वनडे कारकीर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 119 होती.
विश्वचषकात श्रीलंकेसाठी वेगवान शतक
विशेष म्हणजे विश्वचषकात श्रीलंकेकडून वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही मेंडिसच्या नावावर नोंदवला गेला. मेंडिसने शतक ठोकण्यासाठी फक्त 65 चेंडूंचा सामना केला. त्याच्यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या नावावर होता. संगकाराने 2015 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध खेळताना 70 चेंडूत शतक झळकावले होते. (Kusal Mendis becomes the fastest Sri Lankan to score a hundred in ODI World Cup history PAK vs SL)
हेही वाचा-
टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात
रूटने घडवला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करत बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; वाचाच