---Advertisement---

विघ्न संपेना! श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज जखमी, भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार?

On: गुरूवार, जुलै 15, 2021 7:26 AM
---Advertisement---

येत्या १८ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत असलेल्या श्रीलंका संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे. परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाच्या चिंतेत वाढ होताना दिसून येत आहे. संघातील मुख्य फलंदाज कुसल परेरा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर होऊ शकतो.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जिटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली होती, ज्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, श्रीलंका संघाचा विस्फोटक फलंदाज कुसल परेरा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर होऊ शकतो. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकतीच कुसल परेराची वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. परंतु इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्या नेतृत्त्वपदावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Kusal parera doubtful to play against India due to injury)

कुसल परेराचे कर्णधारपद जाणार?
माध्यमातील वृत्तानुसार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की दसून शनाकाला श्रीलंका संघाचे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. कुसल परेराच्या नेतृत्वखाली श्रीलंका संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांना बांगलादेश आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडमध्ये तर श्रीलंका संघाला एकही टी-२० आणि वनडे सामना जिंकण्यात यश आले नव्हते. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट आणि खेळाडूंमध्ये केंद्रीय करारामुळे देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.

असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी २० सामना – २९ जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया खेळणार सराव सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामना

लाईट्स,कॅमेरा,ऍक्शन! श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ‘यंगिस्तान’च्या फोटोशूटची पाहा खास झलक

मुंबईतील फार्मर्स कॅफेबाहेर स्पॉट झाला मास्टर ब्लास्टरचा मुलगा; पॅपराजींनी टिपले फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---