---Advertisement---

या फलंदाजाने ५ चेंडूत ६ बाउंड्री मारून घातली नव्या विक्रमला गवसणी

On: बुधवार, मार्च 7, 2018 7:02 PM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. श्रीलंकेच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावताना कुशल परेराने शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर ५ चेंडूत ६ बाउंड्री मारताना एका खास विक्रमलाही काल गवसणी घातली आहे.

काल परेराने ३७ चेंडूत ६६ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. ही खेळी करताना त्याने फक्त २२ चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले आणि श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिसरे सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसराच खेळाडू बनला आहे.

त्याच्याआधी ही कामगिरी कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी केली आहे. या दोघांनीही श्रीलंकेकडून खेळताना २१ चेंडूत अर्धशतक केले आहे.

परेराला हा विक्रम शक्य झाला तो त्याने शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याच्या पहिल्याच षटकात काढलेल्या २७ धावांमुळे. या षटकात पहिल्याच चेंडूवर परेराने चौकार मारत शार्दुलचे स्वागत केले होते. त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवरही परेराने दोन चौकार मारले तर चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे शार्दूल चांगलाच दबावात आला होता.

याच दबावामुळे शार्दुलने पुढचा चेंडू नोबॉल टाकला. तर परेराने या नो बॉलवरही चौकार मारत शार्दूलवरील दबाव आणखी वाढवला. या नोबॉलमुळे परेराला पुढचा चेंडू फ्री हिट मिळाला. याचा फायदा घेत परेराने पुन्हा षटकार मारला. अशा प्रकारे परेराने ५ चेंडूत ६ बाउंड्री मारल्या.

याबरोबरच शार्दुलने या षटकात २७ धावा देत एक नकोसा असा विक्रम केला आहे. आंतराष्ट्रीय टी२० मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांपैकी तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

आंतराष्ट्रीय टी२० मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज

स्टुअर्ट बिन्नी – ३२ धावा (विंडीज विरुद्ध २०१६ मध्ये)
शार्दूल ठाकूर – २७ धावा (श्रीलंका विरुद्ध २०१८ मध्ये)
सुरेश रैना – २६ धावा (दक्षिण आफ्रिका विरुद्ध २०१२ मध्ये)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment