गुरुवारी (८ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा २२वा सामना पार पडला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमने-सामने आले होते. या सामन्यात हैदराबादने पंजाबला ६९ धावांनी पराभूत केले. यासह पंजाबने हंगामातील ५वा सामना गमावल्याने गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
हंगामाच्या सुरुवातीला चांगले प्रदर्शन करणाऱ्या पंजाब संघाच्या फ्लॉप होणायामागचे कारण, संघातील स्टार खेळाडूंची खराब कामगिरी आहे. त्यातही आयपीएल २०२० लिलावात १०.७५ कोटी रुपयांना पंजाबने विकत घेतलेला अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा सुपर डुपर फ्लॉप ठरला आहे. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी यापैकी एकाही विभागात चांगले प्रदर्शन करता आलेले नाही.
आतापर्यंत पंजाबने खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये विस्फोटक फलंदाज मॅक्सवेलने ३ चौकार मारत फक्त ४८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ही १३ इतकी राहिली आहे. तर यावर्षी त्याची फलंदाजी सरासरी केवळ १२ आणि स्ट्राईक रेट फक्त ८६ इतका आहे. तसेच गोलंदाजी करताना मॅक्सवेलने ४२ चेंडू टाकले आहेत आणि त्यात ६५ धावा देत फक्त १ विकेट घेतली आहे.
मॅक्सवेलव्यतिरिक्त यावर्षी पंजाबने परदेशी खेळाडू शेल्डन कॉट्रेलला ८.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण हा वेगवान गोलंदाजदेखील संघासाठी विशेष कामगिरी करु शकलेला नाही. त्याने ६ सामन्यात ८.८च्या इकोनॉमी रेटने फक्त ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
याव्यतिरिक्त पंजाबच्या पराभवाची अजून बरीच कारणे आहेत. संघाच्या फलंदाजी फळीत सतत होणारा बदल, प्लेइंग इलेव्हनमधील बदल, केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांच्यावर पूर्णपणे संघाचे निर्भर राहणे, तसेच टी२० क्रिकेटमध्ये १३ हजारपेक्षा जास्त धावा करणारा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला संघाबाहेर ठेवणे यांचा यात समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरची चपळाई मयंक अगरवालला पडली महागात, झाला रनआऊट, पाहा व्हिडिओ
‘…म्हणूनच तो दिग्गज खेळाडू आहे,’ बेयरस्टोने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक
ट्रेंडिंग लेख-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..
ऐकलंत का मंडळी! महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार ‘हा’ तमिळ स्टार






