भारतीय संघाचा धुरंदर सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या १३ व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल इतिहासात सलग दोन शतके ठोकणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. त्याने मंगळवारी (२० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध शतक ठोकत हा विक्रम केला. परंतु या विक्रमाबाबत त्याला माहिती नसल्याचे त्याने सामन्यानंतर सांगितले.
धवनने ६१ चेंडूंचा सामना करताना १०६ धावांची अविस्मरणीय शतकी खेळी केली. ही खेळी करत धवनने विक्रम मोडला होता, याबाबत त्याला माहिती नव्हते. त्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मला माहिती नाही.”
धवनने यापूर्वी ६९, ५७ आणि नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. तो म्हणाला की, या डावादरम्यान त्याने पदार्पणाच्या सामन्यासारखी खेळी केली होती.
पुढे बोलताना तो म्हणाला, “मला पंजाबविरुद्ध खेळताना खूप मजा आली. मी या अंदाजात आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळलो होतो. मी सातत्याने धावा करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. पुढच्या सामन्याआधी मी चांगली विश्रांती घेऊन ताजेतवाणे राहील, याची मला खात्री करायची आहे.”
या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर तो म्हणाला, “आज निर्णय आमच्या बाजूने नव्हता. परंतु संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मी एका बाजूने आपली जबाबदारी सांभाळली आणि जेव्हा संधी मिळाली, तेव्हा बाऊंड्री मारली.”
-शिखर ‘द वन’..! सलग २ आयपीएल सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास
-शतक झळकावूनही शिखर धवनने केला ‘हा’ नकोसा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे






