भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला २९६ धावांवर बाद करत आघाडी घेतली होती. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचा अर्धा संघ चौथ्या दिवसाच्या (२८ नोव्हेंबर) पहिल्या सत्राखेरपर्यंत तंबूत परतला होता. दरम्यान न्यूझीलंड संघाकडून चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत २ गडी बाद करणाऱ्या काईल जेमिसनच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला ३४५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव २९६ धावांवर संपुष्टात आला होता. यासह भारतीय संघ दुसऱ्या डावात आघाडी घेऊन मैदानात उतरला होता.
दरम्यान, न्यूझीलंड संघाकडून उंच काठीच्या काईल जेमिसनने अप्रतिम गोलंदाजी करत शुबमन गिलला १ धाव करत माघारी पाठवले, तर चेतेश्वर पुजाराला २२ धावांवर बाद केले. यासह त्याने कसोटीत २० व्या शतकापासून सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
काईल जेमिसनने हा कारनामा भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केला आहे. त्याने १८६५ चेंडूंमध्ये ५० गडी बाद केले आहेत. त्यामुळे कसोटीत २० व्या शतकापासून सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलेंडर आहे. त्याने हा कारनामा १२४० चेंडूंमध्ये केला होता. तसेच दुसऱ्या स्थमी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आहे. ज्याने १८४४ चेंडूंमध्ये सर्वात जलद ५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
कसोटीत सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० गडी बाद करणारे गोलंदाज (२० व्या शतकापासून)
१२४० चेंडू – वर्नोन फिलेंडर
१८४४ चेंडू – ब्रेट ली
१८६५ चेंडू – काईल जेमिसन*
१८८० चेंडू – फ्रँक टायसन
१९४३ चेंडू – शेन बाँड
महत्त्वाच्या बातम्या –
फुटलं ना डोकं! सीमारेषेवरून क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थेट पंचाच्या डोक्यात, व्हिडिओ पाहाच
पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून बाहेर, रचानोक इंतानोनने सेमीफायनलमध्ये केले पराभूत
आता अश्विनची नजर दोन भारतीय दिग्गजांच्या विक्रमावर, ‘हा’ कारनामा करण्यापासून २ पावले दूर






