भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने सामन्याच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले. पहिल्या डावात टिम साउदीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या तर, काइल जेमिसने तीन विकेट्स घेत भारतीय संघाला मर्यादित धावसंख्येवर रोखले.
सामन्याच्या दुसऱ्या डावात देखील वेगवान गोलंदाज जेमिसनने त्याची उत्कृष्ट गोलंदाजी कायम ठेवली असून स्वतःच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केला.
जेमिसनच्या कारकिर्दीतील भारताविरुद्ध खेळलेला हा चौथा कसोटी सामना आहे आणि त्याने या सामन्यात एका नवीन विक्रम केला आहे. सामन्याच्या जेमिसनने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावादरम्यान चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत तीन विकेट्स घेतले आहेत.
दुसऱ्या डावात जेमिसनने सलामीवीर शुभमन गिल (१), चेतेश्वर पुजारा (२२) आणि रविचंद्रन अश्विन (३२) यांचे विकेट्स घेतले आहेत. या तीन विकेट्सच्या मदतीने तो न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध खेळलेल्या पहिल्या चार कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
भारताविरुद्ध खेळलेल्या पहिल्या चार कसोटी सामन्यात जेमिसनने २२ विकेट्स घेतल्या आणि या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जेमिसनने या सामन्याच्या चौथ्या दिवशी रविचंद्रन अश्विनचा विकेट घेतल्यानंतर हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
यापूर्वी न्यूझीलंडचा डार्ली टफी याने भारताविरुद्धच्या पहिल्या ४ कसोटीत २१ विकेट्स घेतले होते आणि तो पहिल्या स्थानावर होता, जमिसनने पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर आता तो या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याव्यतिरिक्त रिचर्ड हेडली आणि ख्रिस मार्टिन यांनी भारताविरुद्ध पहिल्या चार कसोटी सामन्यात प्रत्येकी २० विकेट्स घेतल्या आहेत आणि ते संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. चौथ्या स्थानावर ब्रुस टेलर १८ विकेट्ससह कायम आहे.
दरम्यान, मालिकेतील या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २९६ धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात ४९ धावांनी आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे, कसोटी असो वा टी२०, भारताच्या ‘या’ तीन क्रिकेटपटूंनी तिन्ही प्रकारात झळकावलीत शतके
दिल्ली बुल्सला चीअर करण्यासाठी ‘बेबी डॉल’ची सामन्याला हजेरी, पतीसोबत पोहोचली अबू धाबीत
कडक ना भावा!! भारताविरुद्ध विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करत साउदीची दिग्गज खेळाडूशी बरोबरी