इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेला २ जूनपासून लॉर्डसच्या मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात झाली. दोन्ही संघांसाठी मोठ्या क्रिकेट हंगामाची सुरुवात असल्याने दोन्हीही संघ तयारीने या सामन्यात उतरले होते. त्यामुळे रंगतदार लढतीचा आनंद क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात मिळाला. प्रत्येक क्षणाला पारडे बदलणाऱ्या या सामन्यात अनेक नेत्रदीपक क्षण आले.
असाच एक क्षण चौथ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीला चाहत्यांना अनुभवायला मिळाला. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद केले. एका अप्रतिम चेंडूवर इंग्लिश कर्णधार फसला आणि त्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती जाऊन विसावला.
चौथ्या दिवसाची धमाकेदार सुरुवात
लॉर्डस कसोटीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करतांना ३७८ धावा उभारल्या होत्या. याच्या प्रत्त्युत्तरात इंग्लंडची २ बाद १८ अशी अडखळत सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रॉरी बर्न्सच्या साथीने कर्णधार जो रूटने इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी ९३ धावांची भागीदारी करत दुसर्या दिवसअखेर इंग्लंडला २ बाद १११ अशा सुस्थितीत आणले.
मात्र तिसर्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंडला पुनरागमन करण्यासाठी धमाकेदार सुरूवातीची अपेक्षा होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने पहिल्याच चेंडूवर करामत करत न्यूझीलंडला यश मिळवून दिले. त्याचा हवेत स्विंग झालेला चेंडू जो रूटला कळला नाही आणि त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिप मध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरच्या हाती जाऊन विसावला.
पाहा व्हिडिओ-
New Zealand strike with the first ball of the day.
Scorecard/Clips: https://t.co/7Bh6Sa3TPf#ENGvNZ pic.twitter.com/ccpdcSPKH5
— England Cricket (@englandcricket) June 5, 2021
जेमिसनच्या पायावर साउदीचा कळस
कायले जेमिसनने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेत न्यूझीलंडच्या पुनरागमनाचा पाया रचला. त्यावर अनुभवी टीम साउदीने भेदक गोलंदाजी करत कळस चढवला. टीम साउदीने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या मधल्या फळीला हादरे दिले. त्याने ४३ धावांत ६ बळी घेण्याची किमया केली. त्याला जेमिसनने ३ बळी घेत सुयोग्य साथ दिली. त्यामुळे इंग्लंडचा डाव २७५ धावांवर संपुष्टात आला आणि पहिल्या डावात पाहुण्या न्यूझीलंडला १०३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्डसवरील कामगिरीने टीम साउदीला फायदा, इशांत शर्माला पछाडत या यादीत केली आगेकूच
बांग्लादेशमधील सामन्यात बायो बबलचे उल्लंघन, दिग्गज खेळाडूचे नाव आले समोर