इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (1 एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरले. लखनऊ संघासाठी पदार्पण करत असलेल्या सलामीवीर कायले मेयर्स याने झंझावाती फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हंगामाच्या पहिल्या सामन्यात लखनऊ संघाला अनुभवी क्विंटन डीकॉक याच्याविना मैदानात उतरावे लागले. डी कॉक राष्ट्रीय संघासह असल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या बदल्यात वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू मेयर्स याला पदार्पणाची संधी देण्यात आली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. चौकार मारून त्याने चांगली सुरुवात केली. तो वैयक्तिक 14 धावांवर असताना खलील अहमदने त्याचा सोपा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. त्याने दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आपले पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याचा धावांचा वेग थांबला नाही. बाद होण्यापूर्वी त्याने 38 चेंडूवर 2 चौकार व तब्बल 7 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 192 पेक्षा जास्त होता.
मेयर्स हा वेस्ट इंडिजसाठी तीनही प्रकारचे क्रिकेट खेळतो. उत्कृष्ट फलंदाज व मध्यमगती गोलंदाज म्हणून अनेकदा त्याने संघाला शानदार विजय मिळवून दिले आहेत. मागील वर्षीच लखनऊ संघाने त्याला 50 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, डी कॉक संघात असल्याने त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, एका वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले.
(Kyle Mayers Hits Attacking 73 In IPL Debute For Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या सामन्यापूर्वीच डिविलियर्सची भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्ले-ऑफमध्ये एन्ट्री, MI बाहेरच
पावसाने बिघडवला केकेआरचा खेळ! पंजाबची डकवर्थ-लुईस नियमामुळे 7 धावांनी विजयी सलामी