यंदाचा फुटबॉल मोसम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. जवळजवळ सर्व लीगचे विजेते निश्चित झाले आहेत. इंग्लीश प्रीमियर लीगचे विजेतेपद चेल्सीने जिंकले तर बुन्डस्लिगा सलग पाचव्या वर्षी बायर्न मुनीकने जिंकला. फ्रेंच लीग म्हणजे लीग १ चे विजेतेपद मोनॅको फुटबॉल संघाने पॅरिस सेंट जेर्मेनची मक्तेदारी संपवत पटकावले.
पण ला लीगाचे विजेतेपद अखेच्या दिवसाच्या सामन्यांनवर अवलंबून आहे. ला लीगा मधील सर्वोत्कृष्ट संघ असलेले बार्सेलोना आणि रिआल माद्रिद हे आपापले सामने हे वेगवेगळ्या प्रतिस्पर्धीन विरुध्द खेळतील. माद्रिद ९० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर बार्सेलोना ८७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हा सामना जर माद्रिदने जिंकला तर ते २०१२ नंतर प्रथम हे विजेतेपदक मिळवतील. जर हा सामना हरला आणि बार्सेलोनाने त्यांचा समान जिंकला तर गुण समान होतील आणि ला लीगाच्या नियमानुसार विजेतेपद हे गोल फरकांवर न ठरवता दोन्ही संघातील या वर्षीच्या हेड टू हेड निकलावर दिली जाईल. त्यात मागील महिन्यात मेस्सीच्या मॅजिकल शेवटच्या सेकंदात मारलेल्या गोल मुळे बार्सेलोना विजयी झाली होती तर त्यामु़ळे ते विजेते होतील.
या ५ कारणांमुळे यंदाचे वर्ष ठरले अतिशय लोकप्रिय:
१. लिओनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा:
२०१४ विश्वचषकातील अंतिम सामन्यातील पराभव आणि कोपा अमेरिका चषकाच्या सलग २०१५ आणि २०१६ अंतिम सामन्यातील पराभव आणि अर्जेंटिनाच्या जनतेकडून न मिळणारा प्रतिसाद याला कंटाळून त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या आवडत्या खेळाडूला आता फक्त ला लगा मध्ये पाहता येणार म्हणून या लीगने फुटबॉल रसिकांमध्ये उत्सुकता आणली.
२. बॉलोन डी ऑर साठीचे तिन्ही खेळडू ला लीगा मधील:
वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवडलेले तिन्ही खेळाडू हे ला लीगा मधील होते. विक्रमी ५ वेळेचा विजेता लीयोनल मेस्सी, ४ वेळेसचा विजेता क्रीस्तीयानो रोनल्डो, आणि अँतेनिओ ग्रीज्मन हे तिन्ही ला लीगाच्या टॉप ३ संघातील असल्याने सगळ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष ला लीगा कडे लागले.
३. मेस्सी, नेमार आणि सुआरेझ त्रिकुटाचा खेळ:
बार्सेलोना संघ आणि त्यातील हे खेळाडू फुटबॉल रसिकांनमध्ये खूप चर्चेत आहेत. त्यांचा खेळ आणि मैत्री दोन्ही खेळासाठी आणि लीगसाठी पूरक ठरते आहे.
४. काही वादग्रस्त निर्णय:
खेळाडूंना दिले गेलेले रेड कार्ड्स आणि नेमारवर घातलेली ३ सामन्यांची बंदी या मुळे लोकांचे लक्ष सातत्याने ला लीग कडे वळाले.
५. अखेरच्या क्षणापर्यंत विजेत्याची उत्सुकता:
शेवट्यच्या सामन्यावर स्पर्धेचा विजेता आणि एल क्लस्सीकोत कोण पटकावणार विजेतेपद हे आज दोन्ही सामने झाल्यावर स्पष्ट होईल.