मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे.
कैफने Helo ऍपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले आहेत. त्याने म्हटले आहे की सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाही. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करत नाही.
२०१३ नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे, असेही कैफ म्हणाला.
तो पुढे म्हणाला, आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे.
कैफ बोलला की आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.
टी २० विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू संघात खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघाला क्रिकेटच्या लहान प्रकारामध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहेत.
माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो तेव्हा मी समजेण त्याच्यातील क्रिकेट संपले आहे, असही पुढे कैफ म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी –
केवळ आणि केवळ एका धावेमुळे हुकली होती ‘या’ ६ दिग्गज भारतीयांची शतकं
सचिन सर, दोन- तीन लिंबू माझ्यासाठीही काढा, भज्जीने केली सचिनला खास विनंती