---Advertisement---

स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 1:15 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 5 डिसेंबरपासून गकेबरहा मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 269 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या संघानेही 7 गडी बाद केले होते. पहिल्या दिवसाच्या खेळात श्रीलंकेच्या संघाचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराकटून शानदार कामगिरी पाहायला मिळाली. ज्याने तीन विकेट्स घेत आपल्या नावावर मोठी विक्रम प्रस्थापित केला. यासह लाहिरुने आपले नावही विशेष यादीत समाविष्ट केले.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने गेल्या 6 महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. ज्यामध्ये मोठ्या संघांनाही पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे. लाहिरू कुमारा बद्दल बोलायचे झाले तर तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा श्रीलंकेचा तिसरा गोलंदाज बनला आहे. यासह, तो महान श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विशेष गटाचा भाग बनला. लाहिरूने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 5574व्या चेंडूवर 100वी विकेट घेतली, तर केवळ प्रभात जयसूर्या आणि लसिथ मलिंगा या बाबतीत त्याच्या पुढे आहेत. प्रभातने 5278 चेंडूत 100 बळी पूर्ण केले. तर मलिंगाने केवळ 5029 चेंडूत 100वी कसोटी विकेट घेतली.

श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा गोलंदाज

लसिथ मलिंगा – 5029 चेंडू

प्रभात जयसूर्या – 5278 चेंडू

लाहिरू कुमारा – 5574 चेंडू

दिलहारा फर्नांडो – 6148 चेंडू

दिलरुआन परेरा – 6185चेंडू

एकेकाळी गकेबरहा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात 44 धावा होईपर्यंत तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा रायन रिकेल्टनसह कर्णधार टेंबा बावुमा यांनी डाव सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रायन 101 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर बावुमानेही 78 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

हेही वाचा-

ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट, पहिल्या सत्रात कांगारुंचा वरचढ
IND VS AUS; ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---