---Advertisement---

BREAKING: श्रीलंकेच्या विश्वविजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपआधी घेतला धक्कादायक निर्णय

On: शनिवार, जुलै 22, 2023 4:07 PM
---Advertisement---

श्रीलंका क्रिकेट संघाची सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील कामगिरी चांगली होत आहे. पात्रता फेरीतून त्यांनी वनडे विश्वचषकात आपली जागा बनवली. पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या आशिया चषकात त्यांच्यापुढे आशिया चषक विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल. असे असतानाच, संघाचा अनुभवी फलंदाज लाहिरू थिरिमन्ने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. 2014 मध्ये टी20 विश्वचषक जिंकलेल्या श्रीलंका संघाचा तो भाग होता.

आपल्या 13 वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत श्रीलंकेच्या मजबूत संघाचा भाग राहिलेला थिरिमन्ने निवृत्त होताना म्हणाला,

“देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही अभिमानाची गोष्ट होती. तेरा वर्षाच्या या कारकिर्दीत मिळालेली संधी व तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्वांचे धन्यवाद. लवकरच तुम्हाला एका नव्या भूमिकेत मी दिसेल.”

तसेच त्याने या निवृत्ती मागे कोणतेही कारण दिले नाही. तो श्रीलंका संघासाठी मागील वर्षी भारत दौऱ्यावर त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 2019 पासून वनडे व 2016 पासून तो टी20 संघाचा भाग नव्हता. कुमार संगकारा व महिला जयवर्धने यांच्यासारखे दिग्गज संघात असताना तो मध्यफळीत खेळताना दिसत. त्याने आपल्या कारकिर्दीत 44 कसोटी, 127 वनडे व 26 टी20 सामने खेळले. 2014 मध्ये टी20 विश्वचषकात त्याने श्रीलंकेच्या विजयात मोठे योगदान दिले होते.

(Lahiru Thirimanne retires from international cricket with an immediate effect)

महत्त्वाच्या बातम्या-
‘जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, ती वेळ…’, विक्रमी शतकानंतर काय म्हणाला विराट?
आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---