---Advertisement---

‘जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, ती वेळ…’, विक्रमी शतकानंतर काय म्हणाला विराट?

Virat-Kohli-Statement
---Advertisement---

तब्बल 5 वर्षांचा परदेशात शतक करण्याचा दुष्काळ विराट कोहली याने शुक्रवारी (दि. 21 जुलै) वेस्ट इंडिजमध्ये संपवला. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराटने शानदार शतक झळकावले. हे त्याचे कसोटीतील 29वे आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76वे शतक होते. विशेष म्हणजे, हा विराटचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यात शतक केल्यानंतर विराटने खास प्रतिक्रिया दिली. आता सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. चला तर, विराट नेमका काय म्हणाला जाणून घेऊयात…

काय म्हणाला विराट?
विराट कोहली (Virat Kohli) याने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हटले की, “मी वास्तवात याचा पूर्ण आनंद घेतला. मी चांगल्या लयीत होतो आणि मला हे कायम ठेवायचे होते. जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, तेव्हा ती आव्हानात्मक वेळ होती. अशा वेळी जेव्हा मला आव्हानाचा सामना करायचा असते, तेव्हा मी उत्साहित होतो.”

तो पुढे बोलताना असेही म्हणाला की, “मला धैर्य कायम राखण्याची गरज होती. कारण, आऊटफील्ड संथ होती. हे खूपच समाधानकारक आहे. कारण, मला खूप मेहनत घ्यावी लागली.”

हे विराटचे 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील 76वे शतक आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकर याला मागे टाकले आहे. सचिनने 500 सामन्यांमध्ये 75 आंतरराष्ट्रीय शतके केली होती.

विराट म्हणाला की, “सर्वप्रथम मी यासाठी आभारी आहे की, मला भारताकडून 500 सामने खेळण्याची संधी मिळाली. मी परदेशात 15 शतके केली आहेत. मी भारताच्या तुलनेत परदेशात जास्त शतके केली आहेत. याव्यतिरिक्त मी काही अर्धशतकेही केली आहेत. मला फक्त यावर लक्ष द्यायचे आहे की, मला संघासाठी काय करायचे आहे. मी संघाच्या विजयात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हाही संघाला माझ्या गरज असते, तेव्हा हे आकडे आणि कामगिरी महत्त्वाचे ठरत नाहीत.”

जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहली याने त्याच्या फिटनेसविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “मी माझी काळजी घेतो. सराव, झोप, विश्रांती आणि माझ्या आहाराची काळजी घेतो. एक धाव दोन धावांमध्ये बदलणे माझ्यासाठी सोपे काम आहे. यामुळे मला दबावात मोकळे राहण्यास मदत मिळते. चांगल्या फिटनेसमुळे मला सर्व क्रिकेट प्रकारात खेळण्यास मदत मिळते.”

विराटच्या शतकामुळे भारताच्या 438 धावा
विराट कोहली (Virat Kohli) याने 121 धावांची खेळी साकारून सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात 438 धावा करू शकला. विराटचे हे मागील 5 वर्षांमधील परदेशातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे. त्याने परदेशात अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक 2018मध्ये केले होते. (ind vs wi after scoring a century king virat kohli roared said this know here)

महत्त्वाच्या बातम्या-
आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video
Video – चपळता दाखवणे विराटच्या अंगलट, 121 धाावांवर खेळत असताना अल्झारीच्या सुपर थ्रोने केला घात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---