---Advertisement---

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आणखी एका नावाचा समावेश; या माजी क्रिकेटपटूने केला अर्ज

---Advertisement---

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. झिम्बाब्वे क्रिकेटवर आयसीसीने बंदी घातल्यानंतर त्यांनी भारताचा प्रशिक्षक पदासाठी उत्सुकता दाखवली आहे.

राजपूत याआधी 2007 च्या टी20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक होते.

त्यांनी कॅनडाला जात असताना दुबई विमानतळावरुन भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले असल्याचे वृत्त आहे. कारण 30 जूलै, संध्याकाळी 5 वाजता भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी आणि अन्य सपोर्टस्टाफच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख आणि वेळ होती.

राजपूत यांनी भारताकडून 2 कसोटी आणि 4 वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी अफगाणिस्तानचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे. ते सध्या ग्लोबल कॅनडा लीग स्पर्धेत विनिपेग हॉक्स संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांना 20 वर्षांचा प्रशिक्षकाचा अनुभव आहे.

तसेच पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय राजपूत यांचा मुख्य प्रशिक्षकासाठी विचार करणार नसल्यास फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी विचार करु शकतात

राजपूत यांच्या व्यतिरिक्त बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी रॉबीन सिंग, टॉम मुडी, माईक हेसन, माहेला जयवर्धने यांच्यासारख्या दिग्गजांनीही अर्ज केल्याचे वृत्त आहे. तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी जॉन्टी ऱ्होड्सने अर्ज केला आहे.

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारतीय संघाच्या अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार 2019  विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.

पण त्यानंतर बीसीसीआय नव्याने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. तसेच नव्याने प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करताना शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांना देखील या पदांसाठी मुलाखत देता येणार आहे.

भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सल्लागार समीतीमध्ये कपिल देवबरोबरच माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे मध्य ऑगस्टमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रीलंका आजचा सामना करणार या दिग्गज खेळाडूला समर्पित, जाणून घ्या कारण

२१ चेंडूत शतक करणारा हा फलंदाज करणार टीम इंडियाचे नेतृत्व

सुनील गावस्करांनी केलेल्या टीकेवर एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment