नवी दिल्ली। माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट सुधार समितीचे (सीआयसी) अध्यक्ष लालचंद राजपूत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स काऊंसिलच्या सदस्यांना फटकारले आहे. सचिन तेंडुलकर याचे नाव काही गोष्टीत न येण्याचा इशारा त्यांनी सदस्यांना दिला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात पॅनलसमोर एकूण 24 लोकांची मुलाखतीसाठी निवड झाली होती, त्यातील अनेकांनी प्रशिक्षक निवड प्रक्रियेत सचिनच्या नावाचा गैरवापर केला.
राजपूत यांनी आपल्या ईमेल मध्ये लिहिलं आहे की, “आम्ही सचिन तेंडुलकरचा आदर करतो पण त्याचे नाव सर्वत्र अनावश्यकपणे वापरले जाते. लोक त्याचे नाव वापरून एखाद्याला प्रशिक्षक बनविण्यासाठी दबाव टाकतात. जसे सचिनने त्या व्यक्तीला प्रशिक्षक बनविण्यासाठी स्वतः शिफारस केली.”
“सचिनला जर एखादी शिफारस करायची असेल तर तो थेट अध्यक्ष आणि सीआयसीशी बोलू शकतो. आम्ही सर्वजण त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तेंडुलकर हा एक आदर्श आहे. आम्ही त्याचा आदर करतो आणि मला खात्री आहे की जर त्याच्याकडे काही सूचना असतील, तर आपले मत आमच्यासमोर ठेवण्याचा त्याला हक्क आहे.” असेही राजपूत यांनी लिहिलं आहे.
एमसीआय अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अमित दानी यांच्या ईमेलला उत्तर म्हणून हा ईमेल लिहिला होता. ईमेलमध्ये असे म्हटले होते की “गैरसमज टाळण्यासाठी संयोजक सीआयसीच्या बैठकीत उपलब्ध असावेत.”
याचा राग आल्याने राजपूत यांनी आपल्या मेलमध्ये म्हटले की कोणताही गैरसमज झाला नाही आणि ते चर्चेसाठी तयार आहेत. कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा करू नये याबद्दल दानी त्यांना सल्ला देऊ शकत नाहीत.
ते म्हणाले, “सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात कोणताही गैरसमज नव्हता. कारण मी या दोघांशी बोललो होतो आणि आम्ही आता उमेदवारांची मुलाखत घेत आहोत. बैठक संयोजकाद्वारे बोलवणार आहोत.”
“काहीही बोलायच्या आधी प्रथम वस्तुस्थिती माहित असणे आवश्यक आहे,” असेही ईमेलमध्ये लिहिले आहे.
मुंबई क्रिकेटबद्दल ते म्हणाले, “जर कोणाला हे नाव जाणून घ्यायचे असेल, तर ते मला माहित आहे. परंतु येथे मी ते उघड करू इच्छित नाही कारण मी त्यापेक्षा अधिक परिपक्व आहे. त्यामुळे मी त्याच्या स्तरावर जाणार नाही. मला माहित आहे की मुंबई क्रिकेट का खाली जात आहे? कारण शिखर परिषदेचे सदस्य म्हणून ते दबाव आणू शकतील आणि काम पूर्ण करु शकतील. सीआयसी म्हणून आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही, म्हणूनच एजीएमने स्वतंत्र समितीला क्रिकेट व्यवहार पाहण्याचे आदेश दिले आहेत. ”
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेला धोनीऐवजी हवा होता हा कर्णधार, फक्त एका गोष्टीमुळे बदलले संघमालकाचे मन
-आधीच संकटात असलेली चेन्नई स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड तर मारुन घेत नाही ना???
-दुबईतील आयपीएल भारतापेक्षा होणार भारी, पहा कोण म्हणतंय हे…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०च्या सर्व संघांच्या कर्णधारांचा पगार; रोहित-धोनीपेक्षाही जास्त कमावतो ‘हा’ कॅप्टन