Indian Premier League: 2008मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळण्याची इच्छा नव्हती आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले, हे माजी भारतीय वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने अलीकडेच उघड केले आहे.
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार 2008 ते 2017 या कालावधीत आयपीएलमध्ये खेळला. तो म्हणला की, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स म्हणून ओळखले जाते) हा त्याचा पहिला पसंतीचा संघ होता. कारण दिल्ली त्याचे मूळ गाव मेरठपासून जवळ आहे. तो म्हणाला की, मला आठवते हंगामाच्या आधी आरसीबीच्या अधिकाऱ्याने एका कागदावर सही करण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याला हे माहित नव्हते की, हा करार आहे आणि त्याने त्यावर सही केली. कुमार यानी दावा केला की, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी आरसीबीमध्ये खेळण्यास नकार दिल्यावर त्याची कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती.
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रवीण कुमार म्हणाला, “मला आरसीबीकडून खेळायचे नव्हते कारण बेंगलोर माझ्या घरापासून खूप दूर होते, मला इंग्रजी येत नव्हते आणि जेवणही माझ्या आवडीचे नव्हते. दिल्ली मेरठपासून अगदी जवळ आहे, त्यामुळे मला अधूनमधून माझ्या घरी जाता येत असे. मात्र, मला एका कागदावर सही करायला लावणारी एक व्यक्ती होती. मला माहित नव्हते की, हा करार आहे. मी त्याला सांगितले की, मला बेंगलोरसाठी नाही तर दिल्लीसाठी खेळायचे आहे. ललित मोदींनी मला फोन करून माझी कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती.”
प्रवीण कुमार हे आयपीएलमधील घराघरात नाव पोहचले होते. त्यानी आपल्या कारकिर्दीत पाच वेगवेगळ्या संघांकडून (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स) खेळले होते. त्याने 119 सामन्यांमध्ये 7.73 च्या सरासरीने एकूण 90 विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (Lalit Modi threatened to end my career Praveen Kumar’s shocking revelation about IPL)
हेही वाचा
‘या फॉर्मेटसाठी तो लायक नाही…,’ 12 वर्षांपूर्वी माजी दिग्गजाने विराटबद्दल केलं होतं ट्वीट, आता मात्र वेगळंच काही बोलतोय
पाकिस्तानला मिळालं नवं नेतृत्व! न्यूझीलंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूच्या हातात संघाची धुरा