काऊंटी चॅम्पियनशीपचा संघ लंकेशायर आणि त्यांच्या क्लबने ३ विदेशी खेळाडूंसोबतचा करार रद्द केला आहे. यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर आणि न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू बीजे वॉटलिंग यांचा समावेश आहे.
या ३ क्रिकेटपटूंना लंकेशायरने काऊंटी चॅम्पियनशीप २०२०साठी आपल्यासोबत जोडले होते. पण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) कारणामुळे एकमेकांतील चर्चेनंतर त्यांचा हा करार रद्द करण्यात आला.
न्यूझीलंडचे यष्टीरक्षक फलंदाज वॉटलिंग (BJ Watling) यांनी कांउटी चॅम्पियनशीपच्या या हंगामाच्या सुरुवातीला ९ सामन्यांसाठी लंकेशायरशी करार केला होता. तर, ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि फॉकनर (James Faukner) यांनी टी२० ब्लास्टच्या या हंगामासाठी बोर्डासह हातमिळवणी केली होती.
मात्र, कोविड-१९ या महामारीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Cricket Board) २८ मेपर्यंत सगळे सामने रद्द केले आहेत.
लंकेशायरचे क्रिकेट संचालक पॉल एलॉट यांनी गेल्या २ आठवड्यांपुर्वी या ३ दिग्गज क्रिकेटपटूंशी चर्चा केली होती आणि परिस्थितीसंदर्भात त्यांना सर्व माहिती दिली होती. यानंतर बोर्डातील खेळाडूंशी एकमेकांत बोलणी केल्यानंतर २०२०च्या हंगामाचा करार रद्द करण्यात आला.
यावेळी एलॉट यांनी सांगितले की, “आर्थिक आणि कामकाजाच्या दृष्टीने पाहिले तर ही कांउटी संघासाठी खूप अनिश्चित आणि आव्हानात्मक वेळ आहे. तसेच, हे स्पष्ट दिसत आहे की, ज्या मुंद्द्यांचा आपण आता सामना करत आहोत, त्याचा परिणाम देशांतर्गत हंगामावरही पडणार आहे.”
“परदेशी खेळाडूंबाबत या परिस्थितीत आमच्याकडे एक धोरण आहे, ज्यावर देशव्यापी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार आम्हाला वाटते की, ज्या खेळांडूसोबत आम्ही मुळ स्वरूपात करार केला होता, त्यांच्यासोबत परस्पर बोलून निर्णय घेण्यातच शहानपणा आहे,” असेही एलॉट पुढे म्हणाले.
“आम्ही खेळाडू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहू. तसेच आम्ही ठरवलेल्या धोरणानुसार २०२१च्या अभियानासाठी त्यांच्यासोबत करार करण्याचाही एक पर्याय आमच्याकडे आहे,” असेही पुढे बोलताना एलॉट यांनी सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कधीही विश्वचषक विजेतेपद नशीबात न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर्स
-चेन्नईकडून खेळलेले ३ दिग्गज, जे कुणालाही आठवत नाहीत
-आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स