नुकताच लंकाशायर आणि वार्विकशायर यांच्यात काउंटी चॅम्पियनशिप यांच्यात डिव्हिजन एकचा सामना खेळला गेला. हा सामना मॅनचेस्टर स्थित ओल्ड ट्रेफर्ड मैदानात खेळला गेला. या सामन्यात लंकाशायरच्या २५ वर्षीय फिरकी गोलंदाज मॅट पार्किंसनने एक उत्कृष्ट विकेट घेतली. त्याची ही विकेट पाहून अनेकांना माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची आठवण आली.
लंकाशायर (Lancashire) संघासाठी मॅट पार्किंसन (Matt Parkinson) याने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण ६ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ६० धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात ६४ धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात वार्विकशायर (Warwickshire) संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मायकल बर्गेस (Michael Burgess) पार्किंसनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि त्रिफळाचीत झाला. पार्किंसनने टाकलेला हा उत्कृष्ट चेंडू पाहून प्रत्येकजण हैराण झाला. त्याचा हा चेंडू ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न (Shane Warne) याची आठवण येण्यासारखा होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पार्किंसन लंकाशायरच्या डावातील ६०व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. डावातील चौथा चेंडूवर स्ट्राईकवरील मायकल बर्गेसने चेंडू अडवण्याचे ठरवले होते. परंतु चेंडूने त्याला पूर्णपणे चकवा दिला आणि थेट स्टंपमध्ये घुसला. पार्किंसनच्या या चेंडूचे कौतुक यासाठी केले जात आहे की, त्याने हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. फलंदाजाने चेंडूला रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला नाही. त्याच्या या चेंडूमध्ये शेन वॉर्नची झलक दिसली. वॉर्नने त्याच्या कारकिर्दीत अशाप्रकारच्या अनेक विकेट्स घेतल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/CountyChamp/status/1524030557344174080?s=20&t=4iMOP1UvDep8Rl5Bb8LAnA
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर सामना निकाली होऊ शकला नाही. वार्विकशायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वार्विकशायर संघ ३१५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात लंकाशायर संघ त्यांच्या पहिल्या डावात ३६१ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या डावात वार्विकशायरने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या आणि लंकाशायरला पुन्हा फलंदाजीची संधी देखील मिळाली नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर
युझवेंद्र चहललाही पुरून उरला हसरंगा; आरसीबीच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी केले तोंडभरून कौतुक
आयपीएलमध्ये ‘फ्लॉवर’ समजून बेस प्राईजमध्ये घेतले गेलेले ५ खेळाडू, पण करून दाखवली ‘फायर’ कामगिरी