श्रीलंकेत लंका प्रीमिअर लीग स्पर्धेचा घाट घालण्यात आला आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र, त्या सर्वांवर श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वनिंदू हसरंगा उजवा ठरला आहे. हसरंगा याने या स्पर्धेत त्याच्या फिरकीने कमाल केली आहे. मंगळवारी (दि. 06 डिसेंबर) कोलंबो स्टार्स विरुद्ध कँडी फाल्कन्स संघात स्पर्धेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात हसरंगाने फाल्कन्स संघाकडून खेळताना हॅट्रिक घेत इतिहास रचला. सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
सामन्याचा आढावा
या सामन्यात कोलंबो स्टार्स (Colombo Stars) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी कँडी फाल्कन्स (Kandy Falcons) संघाने फलंदाजीला येत 1 विकेटच्या नुकसानीवर 199 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करण्यात कोलंबो संघ अपयशी पडला. त्यांचा डाव 14.3 षटकात अवघ्या 90 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना फाल्कन्स संघाने तब्बल 109 धावांनी आपल्या नावावर केला.
वनिंदू हसरंगाची हॅट्रिक
कोलंबोविरुद्ध सातव्या षटकात गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने त्याच्याच देशाच्या दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) याला तंबूत धाडले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने बेनी हॉवेल याची विकेट घेतली. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर सीखुगे प्रसन्नाला बाद करत वनिंदू हसरंगाची हॅट्रिक पूर्ण झाली. विशेष म्हणजे, तो या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज बनला आहे.
Is it a historic day or what! First ever hat-trick in LPL by none other than Wanindu Hasaranga 👏👏👏
–
Get your tickets exclusively on https://t.co/VsoVs5Kcnv@OfficialSLC @ipg_productions
–#LPL2022 #LPLT20 #WinTogether #එක්වජයගමු #lankapremierleague2022 #lplt20 #cricket #t20 pic.twitter.com/F4JHTVnk4Z— LPL – Lanka Premier League (@LPLT20) December 6, 2022
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग
सन 2021च्या आयपीएल लिलावात हसरंगाला कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात सामील केले नव्हते. अनसोल्ड राहिल्यानंतर त्याला बदली खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी निवडले. 2022च्या मेगा लिलावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. मात्र, पुन्हा 10.75 कोटींची मोठी बोली लावत ताफ्यात सामील केले. आता त्याच्या या कामिगरीमुळे आरसीबी संघही भलताच खुश झाला असावा. तसेच, पुढच्या आयपीएल हंगामात संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (lanka premier league hat trick for spinner wanindu hasaranga becomes 1st to do in tournament know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेत पहिल्या पराभवाचा वचपा काढणार का रोहितसेना? सामन्याबद्दल सर्वकाही एकाच क्लिकवर घ्या जाणून
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा इतिहास घडवणार? धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये असा राहिलेला बांगलादेश दौरा