लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामना गाले ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स या दोन संघात खेळला जाणार आहे. ग्लेडिएटर्स संघाने कोलंबो किंग्जवर 2 गडी राखून मात केली, तर जाफना स्टॅलियन्स संघाने दांबुला वीकिंग्सवर 37 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली होती.
एलपीएलमधील अंतिम कधी खेळला जाणार
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामना गाले ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यात बुधवारी (16 डिसेंबर) खेळला जाणार आहे.
एलपीएलमधील अंतिम सामना कुठे खेळला जाणार
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामना हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
एलपीएलमधील अंतिम किती वाजता खेळला जाणार
गाले ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
अंतिम सामन्यातील नाणेफेक किती वाजता होणार
लंका प्रीमियर लीगमधील गाले ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यातील अंतिम सामन्याची नाणेफेक भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.
अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येणार
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रसारण सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडीवर पाहता येणार आहे.
अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामना गाले ग्लेडिएटर्स विरुद्ध जाफना स्टॅलियन्स यांच्यात होणार असून याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव वर पाहता येणार आहे.
अंतिम सामन्यातील स्टेडियमधील प्रेक्षकांच्या बैठकीची मर्यादा किती असणार
गाले ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टॅलियन्स यांच्यात खेळल्या जाणार्या अंतिम सामन्यातील स्टेडियममधील प्रेक्षकांच्या बैठकीची मर्यादा 34,300 असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, ‘या’ कारणामुळे टी२० मालिका रद्द
“बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती






