गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वारे पसरले होते. परंतु या स्पर्धेत कोरोनाने बायो बबल भेदून प्रवेश केला होता.संघातील खेळाडूंना ही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा जरी स्थगित करण्यात आली असली, तरी देखील आणखी एक मोठी टी२० लीग स्पर्धा येत्या जुलै महिन्यात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
पहिला हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर श्रीलंकन क्रिकेटने, लंका प्रीमियर लीगचे दुसरे हंगाम येत्या ३० जुलै पासून ते २२ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी या स्पर्धेत बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना देखील खेळण्याची परवानगी दिली होती. श्रीलंका क्रिकेटच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख अर्जुन डी सिल्वा यांनी सांगितले की, “या वर्षीचा हंगाम सुरू करण्यासाठी आम्हाला योग्य वींडो मिळाली आहे. आम्ही सध्या स्पर्धेचे अन्य तपशील निश्चित करण्याचे काम करीत आहोत. श्रीलंका क्रिकेट स्पर्धेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, देशातील आरोग्याची स्थितीचे मूल्यांकन करेल. तसेच आरोग्य मंत्रालयाशी देखील चर्चा करेल.”
या स्पर्धेचे पहिल्या हंगामाचे आयोजन जोरदार करण्यात आले होते. हे सामने हंबनटोटा मध्ये खेळवले गेले होते. ज्यामध्ये ५ संघांनी सहभाग घेतला होता. गतवर्षी देखील कोरोनाच्या नियमांचे पालन केले गेले होते. तसेच या हंगामात देखील सामने बायो बबल मध्ये आणि प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे. तसेच पहिल्या हंगामाचे जेतेपद जाफ़ना स्टालियन्स संघाने मिळवले होते. त्यांनी अंतिम सामन्यात गॉल ग्लैडिएटर्स संघाला पराभूत केले होते.
या स्पर्धेत, भारतीय खेळाडूंना देखील खेळण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोनी आणि सुदीप त्यागी या खेळाडूंनी समावेश घेतला होता. तसेच या स्पर्धेत आता पाकिस्तान संघातील खेळाडू देखील खेळताना दिसून येणार आहेत. तसेच भारतीय खेळाडू खेळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आणि श्रीलंका संघ यांच्यात जुलै महिन्यात, मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ
पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? पाहा कसे आहे शक्य
आता मी याला फ्रेम करणार, आरसीबीच्या कर्णधाराकडून युवा खेळाडूला आकर्षक भेट