---Advertisement---

फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ

On: गुरूवार, मे 13, 2021 11:50 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज मार्नस लॅबुशेन हा आपल्या फलंदाजी साठी खूप प्रसिद्ध आहे. तो वेगवान बाऊन्सर चेंडूला देखील सीमारेषेपार पाठवण्याचा दमखम ठेवतो. तो सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत ग्‍लेमोर्गन संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचा लँकेशायर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लॅबुशेनला तुम्ही अनेकदा, आपल्या तुफान फटकेबाजी मुळे गोलंदाजांचा घाम काढताना पहिलं असेल. परंतु तो आता गोलंदाजी करून फलंदाजांच्या अडचणीत वाढ करताना दिसून येत आहे. त्याने ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर, लँकेशायर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आगळा वेगळा चेंडू टाकल्याचे दिसून आले आहे. हे तेच मैदान आहे. ज्या मैदानावर त्याने २०१९ मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेत जॅक लीचला बाद केले होते.

तर झाले असे की ग्‍लेमोर्गन संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज, लॅबुशेन खरंतर फिरकी गोलंदाज आहे. परंतु त्याने गोलंदाजी करण्यासाठी धाव घेताना वेगवान गोलंदाजांसारख्या सिमवर चेंडू धरला होता. तसेच फलंदाजी करत असलेल्या ल्‍यूक वुडला त्याने वेगवान बाऊन्सर चेंडू टाकला होता. हा चेंडू पाहून फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले होते. हा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेला होता. तरीदेखील यष्टीरक्षण करत असलेल्या क्रिस कूकने हा चेंडू धरला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही पहिली वेळ नाही जेव्हा लॅबुशेनने फिरकी गोलंदाजी करतांना बाऊन्सर चेंडू टाकला आहे. त्याने यापूर्वी ही अनेकदा असे चेंडू टाकले आहे. याची दखल ग्‍लेमोर्गन क्रिकेट संघाने देखील घेतली होती. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लॅबुशेनने काउंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत टाकलेल्या बाऊन्सर चेंडूचा संग्रह करण्यात आला आहे. हा चेंडू पाहून, २०१९ मध्ये झालेल्या टी१० लीग मधील त्या चेंडूची तुम्हाला नक्कीच आठवण आली असेल, अफगाणिस्तान संघाच्या एका गोलंदाजाने आंद्रे रसल बाऊन्सर चेंडू टाकला होता. तो रसलच्या तोंडाला लागता लागता होता. त्यावेळी त्याने हेल्मेट देखील घातले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? पाहा कसे आहे शक्य

आता मी याला फ्रेम करणार, आरसीबीच्या कर्णधाराकडून युवा खेळाडूला आकर्षक भेट

बहुप्रतीक्षित अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक आले समोर, या तारखेला होणार सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---