---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होणार? वाचा आयसीसीचा नियम

On: गुरूवार, मे 13, 2021 12:59 PM
---Advertisement---

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने,ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. या सामन्यात भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून दिसून येत आहे.

ही स्पर्धा दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची आहे. तसेच न्यूझीलंड संघातील फलंदाज आणि गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. परंतु अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, जर हा सामना बरोबरीत सुटला किंवा ड्रॉ झाला तर कोणता संघ विजय होईल. चला तर पाहूया आयसीसीचा नियम काय सांगतो.

हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. परंतु आयसीसीच्या नियमानुसार २३ जून हा दिवस या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर हा मोठा सामना ड्रॉ किंवा बरोबरीत संपला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. कसोटी सामन्यात ३० तासांचा खेळ खेळला जातो. ज्या दिवशी सामना खेळवला जाईल, त्यादिवशी काही कारणास्तव वेळ वाया गेल्यास, राखीव दिवशी त्याची भरपाई करण्यात येऊ शकते.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), वृद्धिमान साहा (फिट असेल तर)
राखीव खेळाडू: अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ –
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.

महत्त्वाच्या बातम्या – 

फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? पाहा कसे आहे शक्य

आता मी याला फ्रेम करणार, आरसीबीच्या कर्णधाराकडून युवा खेळाडूला आकर्षक भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---