---Advertisement---

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 2:27 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी फलंदाज लाला अमरनाथ यांनी आजच्याच दिवशी (१७ डिसेंबर) ८७ वर्षांपूर्वी एक असा विक्रम केला होता, जो त्या मागील बऱ्याच महिन्यांपासून कोणीही केला नव्हता. त्यांनी १९३३ साली मुंबईच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध खेळताना भारतीय संघाकडून कसोटीतील पहिले शतक झळकावले होते. विशेष म्हणजे हा त्यांचा पहिलाच आतंरराष्ट्रीय सामना होता. मात्र, हे देखील खरे आहे की भारताने या सामन्याआधी काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती, पण तरी देखील पहिले शतक हे विशेषच मानले जाते.

स्वतंत्र भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते लाला अमरनाथ
पंजाबमध्ये ११ सप्टेंबर १९११ साली जन्मलेले लाला अमरनाथ हे स्वतंत्र भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते. लाला अमरनाथ यांनी कर्णधार असताना आपला पहिला विजय पाकिस्तान विरुद्ध मिळवला होता. अमरनाथ यांनी शतक झळकावलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर १९३३ साली ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ भारतात दाखल झाला होता.

या मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात अमरनाथ यांनी शतक झळकावले होते. हा सामना मुंबईच्या जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. अमरनाथ यांनी २१ चौकरांच्या मदतीने ११८ धावा केल्या होत्या. ही शतकी खेळी प्रत्येक भारतीय खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

अमरनाथ यांनी पदार्पणातच कसोटी शतक झळकावत उत्तम कामगिरी केली होती. मात्र, या सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा ९ गडी राखून पराभव केला होता. विशेष बाब म्हणजे आपल्या पहिल्या सामन्यातच कसोटी शतक झळकावणाऱ्या लाला अमरनाथ यांना आपल्या पुढील कारकिर्दीमध्ये एकही शतक झळकावता आले नाही.

अमरनाथ यांनी भारतीय संघाकडून २४ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी २४.३८ च्या सरासरीने ८७८ धावा केल्या होत्या. यामध्ये एका शतकाव्यतिरिक्त ४ अर्धशतकाचाही समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाशी झुंज देण्यास ऑसी संघ तयार, पहिल्या कसोटीसाठी ११ खेळाडूंची नावे जाहीर; पाहा संघ

विराटने ‘या’ ठिकाणी आपल्या नेतृत्त्वात सुधारणा करण्याची गरज, व्हीव्हीएस लक्ष्मणने मांडले मत 

स्मिथचा प्रश्न ऐकून विराट भावूक, आली वडिलांची आठवण; पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---