---Advertisement---

जसप्रीत बुमराहने केले क्रिकेटजगतातील सर्वात मोठे खळबजनक विधान

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2020 7:58 PM
---Advertisement---

5 जानेवारीपासून भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

बुमराह त्याच्या घातक यॉर्कर बॉलसाठी ओळखला जातो. त्याला यॉर्कर शिकवण्यामागे लसिथ मलिंगा असल्याची अनेकांचा समज होता. मात्र आता बुमराहनेच यॉर्कर शिकण्याबद्दल मोठा खूलासा केला आहे.

त्याने हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘अनेक जणांना वाटते की मलिंगाने मला यॉर्कर शिकवला. पण ते खरे नाही. त्याने मला यॉर्कर मैदानातील कोणतीही गोष्ट शिकवलेली नाही. मी त्याच्याकडून कोणती गोष्ट शिकलो असेल तर ती मानसिकतेबद्दल आहे.

‘मी त्याच्याकडून वेगवेगळी परिस्थिती कशी हाताळायची, राग कसा नियंत्रित करायचा आणि एखाद्या फलंदाजासाठी कशी योजना आखायची हे शिकलो.’

यॉर्करबद्दल तो म्हणाला, ‘मी टीव्हीवर क्रिकेट पहायचो. जेव्हाही गोलंदाज वेगाने चेंडू फेकून विकेट घ्यायचे तेव्हा मला मजा येत होती. तेव्हा मी विचार केला की मला हे करायचे आहे. मी स्वत:ला माझ्या डोक्यात ब्रेट ली समजायचो. कधी असा चेंडू टाकायचा तर कधी दुसऱ्या प्रकारे चेंडू टाकायचो. मी माझ्या आदर्श गोलंदाजांचे अनुकरण करायचो.’

तसेच तो म्हणाला गली क्रिकेट खेळताना यॉर्कर टाकण्याची सवय झाली. तो म्हणाला, ‘आमच्याकडे रबरी चेंडू होता आणि तो खूप कडक असायचा. तसेच त्यावर कोणतीही सीम मुव्हमेंट होत नव्हती. तो चेंडू खूप स्विंग होत होता.’

‘त्यात यष्टीमागे बाद होण्याची कोणतीही संधी नव्हती. त्यावेळी मी जेवढे शक्य तेवढे फुल लेंथचे चेंडू फेकायचो. फलंदाजाला बाद करायचे असेल तर यॉर्करच टाकावा लागे. मला वाटते याच अनुभवातून मी शिकलो.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---