क्रिकेट जगतात कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक विकेट घेणे त्या गोलंदाजाच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा पराक्रम असतो. तसेच जर कोणत्याही गोलंदाजाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एक नाही तर तब्बल ५ वेळा हॅट्रिक विकेट घेण्याचा कारनामा केला, तर त्या गोलंदाजाबद्दल काही बोलायलाच नको.
कसोटी क्रिकेट, वनडे क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. परंतु जगातील केवळ एकच गोलंदाज आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ वेळा हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे.
तो खेळाडू म्हणजे इतर कोणी नसून श्रीलंकेचा (Sri Lanka) दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगाच्या नावावर एक नाही तर तब्बल ५ हॅट्रिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. मलिंगाने वनडेमध्ये ३ वेळा हॅट्रिक विकेट घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने २ वेळा हॅट्रिक विकेट घेतल्या आहेत.
वनडेतील मलिंगाच्या हॅट्रिक
वनडेत सर्वात पहिल्यांदा मलिंगाने २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना गयानामध्ये हॅट्रिक विकेट घेतल्या होत्या. तर २०११मध्ये कोलंबो येथे केनियाविरुद्ध दुसरी हॅट्रिक पूर्ण केली होती. तसेच तिसरी वनडे हॅट्रिक त्याने २०११मध्येच कोलंबो वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण केली होती.
टी२०मधील मलिंगाच्या हॅट्रिक
याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये मलिंगाने २०१७मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली टी२० हॅट्रिक झळकावली होती. यानंतर २०१९मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध आपली दुसरी टी२० हॅट्रिक पूर्ण केली होती.
४ हॅट्रिक घेणारा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगापूर्वी ४ हॅट्रिक विकेट्स घेण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमच्या (Wasim Akram) नावावर होता. अक्रमने कसोटी आणि वनडेमध्ये प्रत्येकी २ हॅट्रिक विकेट्स पटकाविल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारे गोलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या कुलदीप यादवने दोन हॅट्रिक घेतल्या आहेत. कुलदीप यादवने दोन्ही हॅट्रिक वनडेत घेतल्या आहेत. अन्य गोलंदाजांत ह्युज ट्रॅंबल, थिसारा परेरा, साकलेन मुश्ताक, चामिंडा वास, ब्रेट ली, मोहम्मद सामी व स्टुअर्ट ब्राॅड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेतल्या आहेत.
मलिंगाची कारकिर्द थोडक्यात-
मलिंगाने आतापर्यंत ३० कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १०१ सामने, वनडेत ३३८ आणि टी२०त १०७ विकेट्स घेतल्या आहेत
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता
-विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण
-वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज





