मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या युवजवेंद्र चहल याने शानदार गोलंदाजी केली आहे. पहिल्या ३१ सामन्यांनंतर हंगामात सर्वाधिक विकेट्सही त्याच्याच नावावर आहे. त्यामुळे पर्पल कॅपही त्याच्याच डोक्यावर सजलेली दिसत आहे. त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने सोमवारी (१८ एप्रिल) राजस्थान रॉयल्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅट्रिकसह ५ विकेट्स घेतल्या आणि राजस्थान संघाला ७ धावांनी विजय मिळवून दिला. यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने देखील चहलने खूप कौतुक केले आहे. तो म्हणाला, चहलने दाखवून दिले की लेग स्पिनरला ‘मॅचविनर’ का म्हणले जाते. सोमवारी झालेल्या सामन्यानंतर मलिंगा म्हणाला, ‘चहलकडे खूप आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. तो देशातील सर्वात अनुभवी लेग स्पिनर आहे आणि स्पर्धेतील देखील. त्याने दाखवले आहे की, कशी नियंत्रित गोलंदाजी केली जाते. त्याच्यासाठी देखील हे सिद्ध करणे चांगले आहे की, तो कोणत्याही स्तरावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी सक्षम आहे.’
मलिंगा पुढे म्हणाला, ‘लेग स्पिनरकडे विकेट घेण्यासाठी अधिक पर्याय असतात. चहलने दाखवून दिले की, विकेट्स घेत एका षटकात सामना कसा पालटवू शकतो. त्याने सर्व लेग स्पिनरलाही दाखवले की ते मॅचविनर आहेत.’
कोलकाताचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमनेही चहलचे कौतुक केले. तो म्हणााल, ‘सामना चांगला होता, पण जोस बटलर आणि चहलने त्यांच्याकडून विजय खेचून घेतला. तुम्ही चहलसारख्या खेळाडूला वर्चस्व निर्माण करण्याची संधी देऊ शकत नाही. आम्ही चांगला खेळ केला, पण काही चूका केल्या. अशा गोष्टी होतात. आता सलग तीन पराभवांनंतर आम्हाला पुढच्या सामन्यांत विजयाच्या वाटेवर यावे लागेल.’
सोमवारी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders) सामन्यात जोस बटलरने १०३ धावांची शतकी खेळी केली होती. त्यामुळे राजस्थानने कोलकातासमोर २१८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनी २०० धावांचा टप्पा ओलांडला होता.
पण, १७ व्या षटकात चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे पारडेच राजस्थानच्या बाजूने फिरवले (RR vs KKR). त्याने या षटकातींल शेवटच्या सलग तीन चेंडूंवर श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद केले आणि आयपीएलमधील आपली पहिली हॅट्रिक (IPL Hat-Trick) साजरी केली. तसेच त्याने संपूर्ण सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या ‘रनमशीन’ला झालंय तरी काय? तब्बल १०० सामने झाले तरी होईना शतक, पाहा आकडेवारी
IPL2022| दिल्ली वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
‘माझ्याशी लग्न करशील का?’ महिला चाहतीचा श्रेयस अय्यरला थेट प्रश्न, Photo भन्नाट व्हायरल