श्रीलंकेचा वनेड कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा बुधवारी(3 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडीयमवर पार पडलेल्या सामन्यानंतर लगेचच श्रीलंकेत परतला असून त्याने श्रीलंकेत 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱ्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत भागही घेतला आहे.
विशेष म्हणजे तो मुंबई इंडियन्सकडून बुधवारी रात्री चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यातही खेळला आणि त्यानंतर लगेचच आज(4 एप्रिल) श्रीलंकेतील देशांतर्गत वनडे स्पर्धेतील कँडी विरुद्ध गाले यांच्यात झालेल्या सामन्यातही गालेकडून खेळला.
चेन्नई विरुद्धचा सामना बुधवारी मध्यरात्रीपर्यंत संपला. त्यानंतर तो लगेचच श्रीलंकेला रवाना झाला. तो आज पहाटे श्रीलंकेला पोहचला. त्यांनतर तो काही वेळात सकाळी 9.45 वाजता आज सुरु होणाऱ्या कँडीविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला.
म्हणजे साधारण 12 तासात तो दोन सामने खेळला. एक टी20 चा आणि एक वनडेचा. तेही भारत आणि श्रीलंका या दोन वेगवेगळ्या देशात. त्यातही कमालीची गोष्ट म्हणजे त्याने दोन्ही सामन्यात त्याच्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 4 षटकात गोलंदाजी करताना 34 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या आणि मुंबईला 37 धावांची विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
याप्रमाणेच त्याने आज गालेकडून वनडे सामना खेळताना कँडीविरुद्ध 9.5 षटकात 49 धावा देत तब्बल 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे गाले संघाने कँडीविरुद्ध 156 धावांनी सहज विजय मिळवला. या सामन्यात गालेचे नेतृत्वही मलिंगाने केले.
मुंबई इंडियन्सचे काही सामने मलिंगा मुकण्याची शक्यता-
मलिंगा श्रीलंकेत देशांतर्गत वनडे मालिका खेळण्यासाठी परतला असल्याने तो मुंबई इंडियन्सचे पुढील काही सामने मुकण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेच्या निवड समीतीने त्यांच्या खेळाडूंना विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.
पण मागील आठवड्यातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता तो श्रीलंकेत परतला असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Loving the commitment and your hat, Mali ????????
In less than 12 hours, Malinga has gone from being vital in a win for us in Mumbai to leading Galle in Sri Lanka’s #SuperProvincial 50-over tournament.
Can’t wait to have you back, champ ????#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/GCDg5PQh36
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–पोलार्डने आयपीएल २०१९ मधील घेतला आत्तापर्यंतचा सर्वात अफलातून कॅच, पहा व्हिडिओ
–धोनीला भेटायला आली एक खास चाहती, धोनीनेही सेल्फी घेत केले खूश, पहा व्हिडिओ






