---Advertisement---

आयपीएल २०१९: चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…

On: बुधवार, एप्रिल 3, 2019 2:08 PM
---Advertisement---

आज(3 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा देशांतर्गत वनडे स्पर्धा खेळण्यासाठी आज श्रीलंकेला परतणार आहे.

श्रीलंकेच्या निवड समीतीने त्यांच्या खेळाडूंना विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.

मलिंगाच्या परतण्याबाबत श्रीलंका निवड समीतेचे अध्यक्ष असन्था द मेल यांनी स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सांगितले की ‘हो, मलिंगा बुधवारी श्रीलंकेमध्ये परतणार आहे. त्यामुळे तो सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंटसाठी उपलब्ध असेल.’

मागील आठवड्यातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली होती. पण आता तो श्रीलंकेत परतणार असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मलिंगाने या आयपीएल मोसमात मुंबईकडून दोन सामने खेळले आहेत. पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आलेले नाही

 

मलिंगा जरी श्रीलंकेत परतणार असला तरी जेसन बेऱ्हेंडॉर्फ मुंबई संघात परतला आहे. त्यामुळे तो आज चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मलिंगा ऐवजी खेळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९: बेटिंगप्रकरणी भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठेला अटक

विश्वचषक २०१९ साठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड ठरला पहिला देश!

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक, रोहित शर्माचाही आहे समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment