---Advertisement---

या कारणामुळे कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा सामना ठरणार खास

On: मंगळवार, एप्रिल 2, 2019 4:25 PM
---Advertisement---

जयपूर। आज(2 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 14 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरणार आहे.

कारण त्याचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा 100 वा सामना असणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व करणारा विराट हा केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरणार आहे.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात फक्त एमएस धोनी आणि गौतम गंभीरने नेतृत्व केले आहे. धोनीने एकूण 162 सामन्यात नेतृत्व केले आहे, तर गंभीरने 129 सामन्यात नेतृत्व केले आहे.

विराट 2013 पासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा नियमित कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 99 सामन्यात कर्णधारपद सांभाळताना 44 सामन्यात विजय आणि 50 सामन्यात पराभाव स्विकारला आहे.

8000 ट्वेंटी20 धावा करण्याची विराटला संधी-

विराटला आजच्या सामन्यात आणखी एक खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने आजच्या सामन्यात जर 40 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी क्रिकेटप्रकारात 8000 धावा पूर्ण करेल.

तसेच ट्वेंटी20 मध्ये 8000 धावांचा टप्पा गाठणारा एकूण सातवा तर भारताचा दुसराच खेळाडू ठरेल. यापूर्वी भारताच्या सुरेश रैनाने हा पराक्रम केला आहे.

विराटने आत्तापर्यंत ट्वेंटी20 मध्ये 255 सामन्यात 40.82 च्या सरासरीने 7960 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.

#आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे क्रिकेटपटू –

162 – एमएस धोनी

129 – गौतम गंभीर

99 – विराट कोहली

92 – रोहित शर्मा

74 – ऍडम गिलख्रिस्ट

#ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

12457 धावा – ख्रिस गेल

9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम

9070 धावा – किरॉन पोलार्ड

8701 धावा – शोएब मलिक

8365 धावा – डेव्हिड वॉर्नर

8094 धावा – सुरेश रैना

7960 धावा – विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक, रोहित शर्माचाही आहे समावेश

आयपीएल: युवराज सिंग, सॅम करनच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

आठवण – भारताच्या विश्वविजयाची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment