नुकतेच 19 डिसेंबरला आयपीएल 2020साठी लिलाव पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्सने ख्रिस लिनला 2 कोटी या मुळ किंमतीत खरेदी करत संघात सामील करुन घेतले आहे.
या लिलावानंतर ख्रिस लिनने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिगबॅश लीगमध्ये आज ब्रिस्बेन हिटचे नेतृत्व करताना सिडनी सिक्सर्स विरुद्ध 35 चेंडूत 94 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने तब्बल 11 षटकार मारले आहेत, तर 4 चौकार मारले आहेत.
त्याच्या या खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हिटने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 209 धावा केल्या. त्यानंतर 210 धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सला 20 षटकात 161 धावा करता आल्या. त्यामुळे ब्रिस्बेन हिटने 48 धावांनी विजय मिळवला.
विशेष म्हणजे केवळ लिनच नाही तर सध्या मुंबई इंडियन्स संघात समावेश असलेले कर्णधार रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने 3 चौकार आणि 7 षटकारांसह 51 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर 316 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितनेही अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने 52 चेंडूत अर्धशतक करताना 6 चौकार आणि 1 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे या सामन्याआधी 18 डिसेंबरला झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहितने 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावांची खेळी केली होती.
त्यामुळे मुंबई इंडियन्सचे तीन महत्त्वाचे खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्यांच्यासाठी ही खूशखबर आहे.
…आणि मुंबईकर रोहित शर्मा ठरला शतकातील सर्वात खतरनाक ओपनर
वाचा👉https://t.co/cAsBoeVU7Z👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा
वाचा- 👉https://t.co/IOIiS2rJUw👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #ViratKohli #Forbes2019TopCeleb100— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019