फिफा विश्वचषकामध्ये आज जर्मनीचा सामना कोस्टारिका संघाशी झाला. या सामन्यात ८९ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने कोस्टारिकाचा २-१ असा पराभव केला. जर्मनीकडून कर्णधार जान फिटेन अर्प आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या नोआह अवूकू यांनी गोल केले तर कोस्टारीकासाठी आंद्रे गोमेझ याने एकमेव गोल केला.
सामन्याच्या पहिल्या सत्रापासून जर्मन संघाचा सामन्यात दबदबा राहिला. या सामन्यात १६ व्या मिनिटाला जर्मन कर्णधाराला गोल करण्याची नामी संधी आली होती पण त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर ४ मिनिटांनी फिटेन अर्प याने स्वतः चाल रचली आणि हलके डिफ्लेक्शन देत रूपांतर गोलमध्ये केले आणि जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर २५ व्या मिनिटाला फ्री किक मिळाली पण या फ्री केकचा त्यांना फायदा उचलता आला नाही.
सामन्यातील ३० व्या मिनिटानंतर जर्मन संघाने बॉल स्वतःकडे ठेवण्यावर जास्त भर दिला आणि खेळाची गती कमी केली. या सत्रात जर्मनीला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु त्यांना एका गालवर वर समाधान मानावे लागले आणि पहिले सत्र संपले तेव्हा जर्मनी १-० ने आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात कोस्टारीका संघाने आक्रमक सुरुवात केली या सामन्यात गोल करण्याचा प्रयन्त केला परंतु कोस्टारिका संघाचा कर्णधार अल्फारो लागवलेला फटका जर्मन गोलरक्षक पोगमन याने थोपवला. ५३व्या मिनिटाला जर्मनीसंघाला फ्री किक मिळाली. जर्मन कर्णधार फिटेन अर्प याने लागवलेली फ्री किक गोलजाळ्याच्या वरून गेली.
सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला जर्मन डिफेन्समध्ये झालेल्या चुकांचा फायदा उचलत कोस्टारिकाच्या आंद्रे गोमेझ याने गोल केला. या सामन्यात कोस्टारिकाने १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर जर्मन संघाने विजयासाठी प्रयन्त चालू केले. ७६ व्या मिनिटाला ऍबोह याने उत्तम रन घेतला आणि फिटेन अर्पला पास केला. परंतु अर्प हेडर गोल जाळ्यावर ठेवण्यात अपयशी ठरला.
सामना १-१ असा बरोबरीत सुटणार असे भासत असताना बदली खेळाडू म्हणून आलेल्या नोआह अवूकू याने ८९ व्या मिनिटाला गोल जाळ्याच्या टॉप कॉर्नरचा वेध घेतला आणि जर्मन संघाला २-१ अशी बाधत मिळवून दिली. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना झालेल्या गोलमुळे कोस्टारिकाचे खेळाडू खूप हताश झाले आणि त्याने हा सामना २-१ असा गमावला.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# हा सामना गोवा मधील विश्वचषकाचा पहिला सामना होता. त्यामुळे जर्मन कर्णधार फिटेन अर्प याने लागवलेला गोल गोव्यातील विश्वचषकाचा पहिला गोल ठरला.
# सेलीब्रेशन करताना आपल्या संघातील जखमी खेळाडू लॉडवीग याचा जर्सी नंबर १५ दाखवत त्याने आपल्या खेळाडूला हा गोल समर्पित केला.