शुक्रवार (११ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) संघामध्ये एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ९६ धावांनी जिंकला आणि वेस्ट इंडीजचा तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने पराभव केला. या सामन्यात ८० धावा करणाऱ्या श्रेसय अय्यरने(Shreyas Iyar) मागील दोन महिने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस असल्याचा खुलासा केला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर बसावे लागले होते. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर अय्यर म्हणाला की, “खरे सांगायचे तर गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते. मला कोरोनाची लागण झाली होती, पण हे दिवस त्या दिवसांसारखे संपले. मी कुठेही फलंदाजी करण्य़ासाठी तयार आहे. परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे हे मला चांगले वाटते.”
पुढे अय्यर म्हणाला की, “जर माझ्यावर आजच्यासारखा दबाव टाकला, तर मी त्या क्षणांचा आनंद घेतो. मी आत गेल्यावर मला आजच्याप्रमाणे नवीन चेंडू खेळायला मिळतील. यासाठी तुमच्याकडे चांगले कौशल्य असणे आणि शरीराच्या जवळ खेळणे हे सुद्धा आवश्यक आहे. तिथून तुम्हाला डावातून लय स्थापित करण्याची गरज आहे. हे सोपे नाही परंतु जर तुम्ही तुमच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही ते करू शकाल.”
आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. टी२० मालिकेचा पहिला सामना १६ फेब्रुवारीला, दुसरा सामना १८ फेब्रुवारीला तर तिसरा सामना २० फेब्रुवारीला होणार आहे. या मालिकेचे सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत.
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या वेळी दिल्लीने अय्यरला ७ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. आरसीबीने अय्यरसाठी मोठी बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याशी स्पर्धा केली पण शेवटी कोलकाताने अय्यरला १२.२५ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चहर ब्रदर्सची चांदी! दीपकनंतर राहुल झाला ‘करोडपती किंग’
आयपीएल लिलाव २०२२ | लाॅकी फर्ग्युसनला तब्बल ‘इतके’ कोटी देत गुजरात टायटन्सने केले ‘लाॅक’
IPL Auction: ‘लॉर्ड’ ठाकूर झाला ‘दिल्लीकर’! शार्दुलला १० कोटींहून अधिक रकमेची लागली बोली