पुणे| अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत 30 यार्डस् सिनियर संघाने किरण क्रिकेट अकादमी संघाचा 44 धावांनी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
ए के मैदान, साळुंबरे येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नितिन गुंजाळच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 30 यार्डस् सिनियर संघाने किरण क्रिकेट अकादमी संघाचा 44 धावांनी पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना 30 यार्डस् सिनियर संघाने 20षटकात सर्वबाद 134 धावा केल्या. यात नितिन गुंजाळने 18 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 23 धावा केल्या. मोहम्मद ओसामाने 22 तर हितेन पाटीलने 14 धावा करून नितिनला सुरेख साथ दिली. नितिनच्या अचूक गोलंदाजीपुढे किरण क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 90 धावांत गारद झाला. मोहम्मद ओसामा व नितिन गुंजाळ यांनी प्रत्येकी दोन गडी बोद करत संघाला विजय मिळवून दिला. नितिन गुंजाळ सामनावीर ठरला.
पंकज चौधरीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्राधिकरण जिमखाना संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शादृल कांबळे , प्रतिक फाळके व पंकज चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका शर्मिला बाबर, पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजिंक्य क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मनोज कदम, प्रशिक्षक बशीर नदाफ, रोहन बाबर, प्रणव बिरादार यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
30 यार्डस् सिनियर: 20षटकात सर्वबाद 134 धावा(नितिन गुंजाळ नाबाद 23(18,3×6), मोहम्मद ओसामा 22(14,2×4,1×6), हितेन पाटील 14(11,1×4,1×6),विनित भोसले 12(18), आयुष अनुशे 2-13, वेदांग शिरसाट 2-33, प्रज्वलथावले 2-28) वि.विकिरण क्रिकेट अकादमी: 20 षटकात सर्वबाद 90 धावा(अथर्व पाटील 16(27,2×4), हिमांशूचौगुले 11(14,2×4), मोहम्मदओसामा 2-9, नितिन गुंजाळ 2-11) सामनावीर- नितिन गुंजाळ
30 यार्डस् सिनियर संघाने 44 धावांनी सामना जिंकला.
आदिनाथ क्रिकेट क्लब : 17.2 षटकात सर्वबाद 58 धावा(निलेश जोगदंड 9(13), शादृल कांबळे 2-0, प्रतिक फाळके 2-6, पंकज चौधरी 2-2) पराभूत वि प्राधिकरण जिमखाना : 6 षटकात 1 बाद 62 धावा(सारंग बावळे नाबाद 24(17, 3×4), पंकज चौधरी 11(15,1×4), श्रियश जगदाळे 1-7) सामनावीर- पंकज चौधरी
प्राधिकरण जिमखाना संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!
सेंच्यूरियनच्या मैदानावर द. आफ्रिकेने गमावल्यात फक्त २ कसोटी, पण भारताचं अजूनही नाही उघडलं खातं
आशिया चषकात नव्या ‘मलिंगा’चा कहर! फलंदाजांना दिवसा दाखवलं चांदणं, व्हिडिओ सर्वत्र व्हायरल
हेही पाहा-