बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये शानदार प्रदर्शन करणारा भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल याला चांगला फायदा झाला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 85 धावांची शानदार खेळी साकारली होती. त्यानंतर टी20 मालिकेच्या चौथ्या सामन्यातही त्याने 77 धावा चोपल्या होत्या. अशात आता गिलने वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप घेतली आहे.
शुबमन गिल वनडे रँकिंगमध्ये (Shubman Gill ODI Rankings) चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. शुबमन गिल (Shubam Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात आता चार स्थानांचे अंतर आहे. विराट वनडे रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल 10 फलंदाजांमध्ये फक्त शुबमन आणि विराटच आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) अव्वल 10च्या यादीतून बाहेर पडला. तो 11व्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. त्याचे 880 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन डर ड्युसेन दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, तिसऱ्या स्थानी इमाम उल हक असून त्याचे 752 गुण आहेत. याव्यतिरिक्त आयर्लंडचा हॅरी टेक्टर सहाव्या स्थानी असून त्याचे 726 गुण आहेत.
Pakistan stars surge in the @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings after a dominant display against Afghanistan 🔥https://t.co/PEXvb6R2K8
— ICC (@ICC) August 23, 2023
गोलंदाजीत सिराज आणि कुलदीप अव्वल 10मध्ये
दुसरीकडे, गोलंदाजांच्या वनडे रँकिंगविषयी बोलायचं झालं, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव हे अव्वल 10मध्ये सामील आहेत. सिराज पाचव्या स्थानी आहे. त्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्याचे 670 गुण आहेत. तसेच, कुलदीप यादव 10व्या स्थानी असून त्याचे 622 गुण आहेत. याव्यतिरिक्त जोश हेजलवूड अव्वलस्थानी आहे. त्याचे 705 गुण आहेत. मिचेल स्टार्क दुसऱ्या स्थानी असून त्याचे 686 गुण आहेत. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या स्थानी आहे. त्याचे 680 गुण आहेत.
संघांच्या वनडे रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानी
खरं तर, वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे. भारताचे 113 गुण आहेत. तसेच, पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचे 116 गुण आहेत. तसेच, ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह अव्वल स्थानी आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघ टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. तिथे भारताचे 264 गुण आहेत. यात इंग्लंड 259 गुणांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड संघ 256 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (latest icc odi ranking know shubman gill virat kohli rohit sharma positions)
हेही वाचा-
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ