दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. बोर्डाने महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार म्हणून अनुभवी फलंदाज लॉरा वॉल्वार्ट हिची नियुक्ती केली गेली. ती तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल. आगामी बांगलादेश दौऱ्यापासून ती ही जबाबदारी सांभाळेल.
सुने लूस कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर लॉरा वॉल्वार्टची कार्यवाहक कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान तीने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही संघांविरुद्धच्या घरच्या मैदानावर वनडे मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. 24 वर्षीय वोल्वार्ट दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळली आहे. तीने एक कसोटी, 86 वनडे आणि 59 टी20 मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तीने 32 धावा, वनडेत 3421 धावा आणि टी20 मध्ये 1313 धावा केल्या आहेत.
बेनोनी येथे 3 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. यानंतर, शेवटचे दोन सामने अनुक्रमे 6 आणि 8 डिसेंबर रोजी किम्बर्ले येथे खेळले जातील. तर, वनडे मालिका 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
लॉरा वोल्वार्ट (कर्णधार), एनेके बॉश, तजमीन ब्रिट्स, एनेरी डर्कसेन, माइक डी रिडर, लारा गुडऑल, अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता, मसाबाटा क्लास, सुने लूस, एलिज़-मारी मार्क्स, नोनकुलुलेको एमलाबा, तुमी सेखुखुने, नोंडुमिसो शांगसे, डेल्मी टकर.
(Laura Wolvvartd Become New South Africa Womens Cricket Team Captain In All Three Format)
हेही वाचा-
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”