पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स, डेक्कन ड, ओएमडीटी अ या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात लॉ कॉलेज लायन्स संघाने डेक्कन क संघाचा 24 -10 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
100अधिक गटात लॉ कॉलेज लायन्सच्या श्रीकृष्णा पानसेने केतन जाठरच्या साथीत डेक्कन क संघाच्या सतीश बापट व राजेंद्र भोपळे यांचा 6-5(9-7) असा तर, खुल्या गटात लॉ कॉलेज लायन्सच्या केतन जाठर व अभिजित मराठे यांनीडेक्कन क संघाच्या आशिष धोंगडे व सुधीर रानडे यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.
90अधिक गटात लॉ कॉलेज लायन्सच्या शिवाजी यादव व जयभाई संतोष या जोडीने डेक्कन क संघाच्या मयूर गुजराथी व भरत ससाणे यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात लॉ कॉलेज लायन्सच्या तारक पारीख व संतोष बोरसे यांनी डेक्कन क संघाच्या संजय पाटील व राजेंद्र भोपळे यांचा 6-2 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात राजीव पाघे, केदार पाठक, आदित्य खटोड, पराग देसाई, अजय जाधव, विक्रम उंबरानी, विभाष वैद्य यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ड संघाने एफसी लिजंड्सचा 24-5असा एकतर्फी पराभव केला.
अन्य लढतीत ओएमडीटी अ संघाने एफसीटीसी संघावर 24-9अशा फरकाने विजय मिळवला. विजयी संघाकडून उदय चोप्रा/संतोष कुराडे, चंदन नागडकर/कोनार कुमार, अतुल मानवकर/नितीन सिंघवी, बिनेश राजन यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.डेक्कन क 24 -10 (100अधिक गट: श्रीकृष्णा पानसे/केतन जाठर वि.वि.सतीश बापट/राजेंद्र भोपळे 6-5(9-7); खुला गट: केतन जाठर/अभिजित मराठे वि.वि.आशिष धोंगडे/सुधीर रानडे 6-2; 90अधिक गट: शिवाजी यादव/जयभाई संतोष वि.वि.मयूर गुजराथी/भरत ससाणे 6-1; खुला गट: तारक पारीख/संतोष बोरसे वि.वि.संजय पाटील/राजेंद्र भोपळे 6-2);
डेक्कन ड वि.वि.एफसी लिजंड्स 24-5(100अधिक गट: राजीव पाघे/केदार पाठक वि.वि.कर्नल आगाशे/पांडुरंग 6-4; खुला गट: आदित्य खटोड/पराग देसाई वि.वि.आदित्य सोनटके/मनमित लांबा 6-1; 90अधिक गट: अजय जाधव/विक्रम उंबरानी वि.वि.महेंद्र देवकर/हेमंत साठे 6-0; खुला गट: विभाष वैद्य/केदार पाठक वि.वि.संजय पाटील/अविनाश हूड 6-0);
ओएमडीटी अ वि.वि.एफसीटीसी 24-9(100अधिक गट:उदय चोप्रा/संतोष कुराडे वि.वि.प्रोफेसर एव्ही रायरीकर/सुनील लोळणकर 6-3; खुला गट: चंदन नागडकर/कोनार कुमार वि.वि.देवेंद्र दडवे/सिद्धेश परळकर 6-0;90अधिक गट: अतुल मानवकर/नितीन सिंघवी वि.वि.कपिल जोशी/चिंतामणी चितळे 6-2; खुला गट: बिनेश राजन/संतोष कुराडे वि.वि.अमित नूलकर/सुनील जोशुआ 6-4).