पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशातील मीरपूर येथे सराव सत्रादरम्यान पाकिस्तानने आपला राष्ट्रध्वज फडकावला होता. या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाने सरावाच्या वेळी झंडा फडकवण्याची परवानगी मागितली होती. मात्र आता या घटनेने नवे वळण घेतले आहे. पाकिस्तान संघाविरुद्ध ढाका येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण पाकिस्तान संघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात संघाचा कर्णधार बाबर आझमसह २१ खेळाडूंची नावे आहेत.
सराव सत्रादरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावला होता. तर बांगलादेशी नागरिकांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवादरम्यान, हे कृत्य एक राजकीय संदेश म्हणून घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय किंवा द्विपक्षीय खेळांमध्ये राष्ट्रीय ध्वज पारंपारिकपणे फडकवले जात असले तरी २०१४ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या कायद्यावर बंदी घातली होती. बीसीबीने परदेशी राष्ट्रांना त्यांच्या भूमीवर राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी घातली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने हा निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला होता.
या प्रकरणावर पाकिस्तान संघाचे मीडिया मॅनेजर यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “आमच्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. सकलेन मुश्ताक संघात सामील झाल्यापासून हे त्यांच्या प्रशिक्षण तत्त्वज्ञानाचा एक भाग राहिला आहे. त्यांना वाटते की देशाचा ध्वज खेळाडूंसाठी प्रेरणादायी असतो.”
पाकिस्तान सध्या बांगलादेशमध्ये आहे आणि दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ नोव्हेंबर रोजी जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल. पाकिस्तानने बांगलादेश संघाला त्यांच्याच भूमीवर टी-२० मालिकेत नमवले आहे. टी-२० मालिकेतील दारुण पराभवानंतर बांगलादेश संघ कसोटी क्रिकेटमध्ये छाप पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. पहिली कसोटी २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रहस्य उलगडलं! ‘डेब्यू कॅप’ देताना असे काही म्हणाले होते गावसकर, श्रेयसलाही नव्हती या गोष्टीची कल्पना
आहा कडकच ना! पती शोएब मलिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार सानिया मिर्झा? व्हिडिओ व्हायरल
लय भारी! ज्याने आपली जागा घेत कानपूर कसोटीत शतक ठोकले, त्याचीच विराटने थोपटली पाठ