Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आहा कडकच ना! पती शोएब मलिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार सानिया मिर्झा? व्हिडिओ व्हायरल

November 26, 2021
in क्रिकेट, टेनिस, टॉप बातम्या
Photo Courtesy: Instagram/ShoaibMalik

Photo Courtesy: Instagram/ShoaibMalik


भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू व सानियाचा पती शोएब मलिक अनेदका चर्चेचा विषय ठरतात. ही जोडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दोघा पती-पत्नीने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एखाद्या मालिकेचा किंवा फिल्मचा टीजर असन्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाहत्यांना या व्हिडिओ नेमका कशाचा आहे आणि या दोन दिग्गजांचा त्याच्याशी काय संबंध आहे? याविषयी प्रश्न पडला आहे.

सानिया आणि शोएब यांनी स्वतःच्या इंस्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून हा त्यांच्या एकत्रित प्रोजेक्ट असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या इंस्टाग्राम पोस्टला जवळपास एकसारखेच कॅप्शन दिले आहेत आणि हॅशटॅगच्या मदतीने लिहिले आहे की “लव इज द एअर.” चाहते असा अंदाज व्यक्त करत आहेत की, त्यांनी जो हॅशटॅग वापरला आहे, तेच त्यांच्या प्रोजेक्टचे नाव असावे.

सानियाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ज्या प्रोजेक्टवर मी काम करत आहे, त्याचा टीझर शेअर करण्यासाठी उत्साहित आहे. याचे पूर्ण व्हर्जन लवकरच येत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

तर शोएब मलिकने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “मला माझ्या प्रोजेक्टचा टीजर शेअर करताना अभिमान वाटत आहे. लवकरच तुम्हाला याचे पूर्ण व्हर्जन मिळेल.”

View this post on Instagram

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

यो दोघांनी कॅप्शनमध्ये या व्हिडिओसंदर्भात माहिती दिली असली तरी, अजून हे स्पष्ट होऊ शकले नाही की, हा एक चित्रपट आहे की मालिका?. अशात चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही चाहत्यांच्या मते हा एक चित्रपट आहे, तर काहींच्या मते हा सानिया आणि शोएबच्या प्रेमप्रकरणावर आधारीत चित्रपट आहे.

व्हिडिओत शोएब मलिकची झलक पाहायला मिळत आहे. सानिया या व्हिडिओत दिसत नाहीय. तरीही चाहते अशी शक्यता व्यक्त करत आहेत की, सानिया देखील या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. दरम्यान, शोएब या व्हिडिओत धावताना आणि गाडीतून बाहेर येताना दिसत आहे. तर एक महिला खेळाडू पांढऱ्या कपड्यांमध्ये टेनिस खेळताना दिसत आहे, या महिलेचा चेहरा दिसत नसल्यामुळे चाहते अंदाज लावत आहेत की, ती सानियाच आहे.

दरम्यान, सानिया आणि शोएब हे त्यांच्या विवाहाच्या आधीपासून चर्चेत होते. २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर २०१० च्या एप्रिल महिन्यात या दोघांनी विवाह केला. आता या जोडप्याला एक तीन वर्षाचा मुलगा आहे, ज्याचे नाव इजहान मिर्झा मलिक असे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय फलंदाजांचा घाम काढणाऱ्या जेमिसनला उमेशने ठोकला उत्तुंग षटकार, व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

भर सामन्यात अश्विनकडून घडली चूक, संतापलेल्या साउदीची थेट पंचांकडे तक्रार; पाहा घडलेला प्रकार

अधुरी कहाणी! रेखापासून ते दीपिकापर्यंत या अभिनेत्रींच्या प्रेमात पडले क्रिकेटपटू, पण नाही होऊ शकले लग्न


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

रहस्य उलगडलं! 'डेब्यू कॅप' देताना असे काही म्हणाले होते गावसकर, श्रेयसलाही नव्हती या गोष्टीची कल्पना

Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB

बांगलादेशात बाबर आझमसिहत संपूर्ण पाकिस्तान संघावर झाला गुन्हा दाखल! कारण आहे गंभीर

Photo Courtesy: Twitter/BCCI

'हे' चौघे द्रविडच्या निरोप सामन्यात होते त्याचे टीममेट्स, आता त्याच्याच प्रशिक्षणाखाली खेळतायत कानपूर कसोटी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143