---Advertisement---

आयसीसीने विचारले या दशकातील सर्वात आवडत्या कर्णधाराचे नाव; चाहत्यांनी दिले उत्तर…

On: शुक्रवार, डिसेंबर 27, 2019 2:29 PM
---Advertisement---

2019 हे वर्ष संपत आले आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने (ICC) या दशकातील चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या विक्रमांची यादी काढायला सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर आता आयसीसीने या दशकातील सर्वोत्तम कर्णधार (Best Captain In A Decade) निवडण्याची जबाबदारी चाहत्यांवर सोपविली आहे. आयसीसीच्या या प्रश्नावर अनेक उत्तरे चाहत्यांकडून आली आहेत.

अनेक चाहत्यांनी या दशकातील कर्णधार म्हणून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni)अधिक पसंती दिली आहे.

भारताने धोनीच्या नेतृत्वात याच दशकात 2011 चा विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या 2 वर्षांनंतर त्याच्या नेतृत्वाखाली चँपियन्स ट्राॅफीमध्येही (Champions Trophy) भारताने विजय मिळवला होता. यापूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी20 विश्वचषक जिंकला होता.

त्याचबरोबर धोनीव्यतिरिक्त काही चाहत्यांनी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचेही नाव घेतले आहे. काहींनी भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीलाही पसंती दिली आहे. काहींनी रोहित शर्मा, स्टिव्ह स्मिथ यांच्या नावांनाही पसंती दिली. अशी अनेक वेगवेगळी उत्तरे चाहत्यांनी दिली आहेत.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया – 

https://twitter.com/msd7_prashanth/status/1208977636569030656

https://twitter.com/PB_MSD/status/1208981515868102656

https://twitter.com/Billa_Off/status/1208977030189998080

https://twitter.com/kingkohli__fan/status/1208998526417436672

https://twitter.com/Naveenachary99/status/1208975904661131264

https://twitter.com/DanSingh01/status/1208980140908134400

https://twitter.com/Jeetv27/status/1209823874457563137?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1209823874457563137&ref_url=https%3A%2F%2Fwww.icc-cricket.com%2Fnews%2F1545135

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---